Saturday 8 April 2023

*विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यांच्यावतीने 'समावेशीत शिक्षण' अंतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन आज करण्यात आले होते.* _पांचगणी येथील भव्य-दिव्य व उत्तम निसर्ग सानिध्य लाभलेल्या *ON WHEELS-AMUSEMENT PARK* मध्ये या नाविन्यपूर्ण क्षेत्रभेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...FERRIES WHEEL, RAINBOW, OCTOPUS, SUN AND MOON, STRIKING CAR, BRAKE DANCE, TSUNAMI, MONOTRAIN, BABY TRAIN, HORROR HOUSE, ZYCLONE, ARCHERY, BUNGY JUMPING या सारख्या वेगवेगळी 12 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या amusement पार्क मध्ये आहेत. प्रत्येक राईडचा थरार विद्यार्थ्यांनी अनुभवला..._ *गावातील यात्रेमध्ये अगदी लहान व थोडी खेळणी यांचा अनुभव विद्यार्थ्यांना होता परंतु एवढ्या प्रचंड मोठ्या आकाराची खेळणी पाहिल्यानंतर विद्यार्थी हरखून गेले... सुरुवातीला काही प्रमाणात बुजलेले विद्यार्थी एका एका राईडचा थरार अनुभवताना खूप आनंदी झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील ओसांडणारा आनंद त्याची साक्ष देत होता...* _दुपारच्या सत्रात तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्मानीय आनंद पळसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी व पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधला..._ *यावेळी सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. व्हेज पुलाव, कोशिंबीर, जिलेबी यावर विद्यार्थ्यांना मनसोक्त ताव मारल्यानंतर पुन्हा नवीन जोशात समुद्री माशांचे विविध प्रकार पाहिले व त्यांची माहिती घेतली.. हॉरर हाऊसचा थरार पाहताना विद्यार्थ्यांनी वेगळीच मजा अनुभवली...* _खरोखरच विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा सदैव स्मरणात राहणारा आनंदाचा दिवस कधी संपला हे विद्यार्थ्यांना समजलेच नाही. काही प्रमाणात दुर्लक्षित असलेली ही बालके आज या निमित्ताने खरोखर आनंदी दिसत होती.._ *या विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी या सुंदर उपक्रमाचे आयोजन करणारे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे साहेब तसेच समावेशीत शिक्षण उपक्रमातील साधनव्यक्ती सचिन चव्हाण सर, श्रीनिधी जोशी मॅडम, कुलदीप अहिवळे सर, खामकर सर यांच्या नेटक्या नियोजनात आजचा क्षेत्रभेटीचा उपक्रम संस्मरणीय ठरला...* ✒️शब्दांकन:- *श्री.विष्णू ढेबे,चिखली..*

Tuesday 14 March 2023

पर्यावरण पूरक रंगपंचमी

चिखली शाळेत नैसर्गिक रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली, तालुका महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांची निर्मिती करून पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्साहात साजरी केली. रंगपंचमीचा सण हा आबालवृद्ध यांच्या आवडीचा असतो, कृत्रिम व रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले रंग हे त्वचेसाठी हानिकारक असतात, त्यातून विविध त्वचा विकार, तसेच ऍलर्जी सारख्या समस्या उद्भवतात. तसेच पाण्याचा अपव्यय यातून पर्यावरण हानी मोठ्या प्रमाणात होत असते. बालपणापासून पर्यावरण विषयक दृष्टिकोन रुजावा यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.विअर्थ इसेनशिअल्सच्या स्वप्नील बोधे व सोनिया बोधे तसेच वांगो ग्रीनचे वैदेही नायर व आदित्य नायर यांच्या माध्यमातून नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा सकाळच्या सत्रात घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना निसर्गात विविध रंगांच्या वस्तू गोळा करण्यासाठी सांगण्यात आले विद्यार्थ्यांनी जास्वंद, मोगरा, शंभुकेस यांसारखी फुले ,टोमॅटो स्ट्राबेरी, पालक भाजी, विविध झाडांची पाने, बीट, हळद, चुना, तांदळाचे पीठ, माती, विविध रंगांची माती, लिंबू, सुगंधासाठी गुलाब पाणी यांसारख्या निसर्गात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून सोळा प्रकारच्या विविध रंगछटा तयार करून घेण्यात आल्या. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या रंगाची उधळण करून रंगपंचमी खेळण्यास सुरुवात केली. रंगपंचमीच्या विविध गाण्यांवर ठेका धरत उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.नैसर्गिक रंगांमुळे मुलांना कोणताही त्रास जाणवला नाही. तसेच पाण्याचा अगदी कमीतकमी वापर करून रंगपंचमी खेळल्यामुळे पाण्याचा अपव्ययही टाळला गेला. यापुढेही अशीच पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. यावेळी गावातील आबालवृद्धही या उपक्रमात सहभागी झाले होते.शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे तसेच उपशिक्षक महेश पवार यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.दाभे शाळेचे सचिन कुंभार सर तसेच जावली शाळेचे संतोष चोरगे सर, ओमकार जाधव, सागर जाधव सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे कोंडीबा जाधव व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते

Sunday 30 October 2022

शिक्षक ध्येय तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन

https://kutumbapp.page.link/dqp5LVPPdWtfHGQT6 https://kaushalyavikas.blogspot.com/2022/10/blog-post_29.html *राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा’* *_'शिक्षक ध्येय तर्फे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल जाहीर करणार_* शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२२' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. 'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून दोन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. सद्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे 'चित्रकला' होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी... https://kaushalyavikas.blogspot.com आणि https://shikshakdhyey.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ◆●◆ जॉईन व्हा... https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX ◆●◆ ★ *शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय...* https://shikshakdhyey.in ◆●◆ https://kutumbapp.page.link/dqp5LVPPdWtfHGQT6 ◆●◆

Friday 31 July 2020

प्रज्ञाशोध, नवोदय, शिष्यवृत्ती तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान सराव चाचण्या.---शालेय अभ्यासक्रमावर सर्व विषयांवरआधारित या चाचण्या आहेत. दररोज दहा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी सोडवण्यासाठी सदरची प्रश्नमंजुषा उपलब्ध केली जाईल.खालील निळ्या रंगातील लिंकवर क्लिक करून चाचणी सोडवा. *सामान्यज्ञान सराव चाचणी क्रमांक 1 ते 10* *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 1* testmoz.com/2717291 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 2* testmoz.com/2717781 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 3* testmoz.com/2718157 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 4* testmoz.com/2718595 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 5* testmoz.com/2719169 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 6* testmoz.com/2744437 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 7* testmoz.com/2744885 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 8* testmoz.com/2755529 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 9* testmoz.com/2755885 *सामान्यज्ञान चाचणी क्रमांक - 10* testmoz.com/2756243 वरील लिंक ओपन झाल्यावर आपल पूर्ण नाव मराठी किंवा इंग्रजी मधून टाकावे, दिलेले दहा बहुपर्यायी प्रश्न सोडवावेत. Submit केल्यावर लगेच आपला निकाल आपल्यास कळेल. शेवटी चुकलेले प्रश्न वहीत दुरुस्त करून लिहावेत. *सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.* *निर्मिती - विष्णू ढेबे ,महाबळेश्वर* तसेच इतर शैक्षणिक माहिती ,बोधकथा, सुविचार, कविता, लेख, शिष्यवृत्ती परीक्षा,शैक्षणिक चित्रपट, बालभारतीची पुस्तके डाउनलोड करण्यासाठी खालील ब्लॉगला नक्की भेट दया. www.vishnudhebe.blogspot.com

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...