शैक्षणिक विचार

: I AM A TEACHER.............. 

I May be a School Teacher/ 
I May be a College Lecturer /
I May be a University Professor.

Behind That Doctor, 
It is Me, a Teacher........... 

Behind That Engineer, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That Statistician, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That Nuclear Physicist, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That Mathematician, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That  Scientist, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That Zoologist, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That Entomologist, 
It is Me, a Teacher..........

Behind That Botanist, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That Economist, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That Entrepreneur, 
It is Me, a Teacher..........

Behind That Lawyer, 
It is Me, a Teacher..........

Behind That  Political Scientist, 
It is Me, a Teacher..........

Behind That  Psychologist, 
It is Me, a Teacher..........

Behind That  Musician, 
It is Me, a Teacher..........

Behind That  Architect, 
It is Me, a Teacher.......... 

Behind That  Astrologer, 
It is Me, a Teacher..........

Behind That Astronomer,
It is Me, a Teacher..............

I Carry the Light Even Though They Mostly Make  Fun Of Me By Their Uncharitable Jokes ... But I am a Teacher........ 

I Don't Qualify for a Bungalow or a Villa nor Earn Enough to Buy an Expensive House or a Car............. Like Corrupt Officers and Corrupt Politicians. But Yes, I am a Teacher...........

Some Think or Even Say That I Have too Many Holidays. They  Never Know That I Spend Those Holidays Either Correcting Papers or Planning What and How I am Going to Teach When I Go Back to School/College/University /Institution........ 
Because I am a Teacher.....

Sometimes I Get Confused and Even Get Stressed by the 
Ever-changing Policies Over What And How I Have to Teach....... 

Despite All That, I am a Teacher and I Love to Teach and I am Teaching ....

On Pay-days I Don't Laugh as Corrupt Officers and Others Do, But by the Next Day I Love to Come With a Smile to Those That I Teach.....   Because I am a Teacher....

The Main Source of My Satisfaction is When I See Them Growing. I See Them Succeeding. I See Them Having All Those Assets. I See Them Bravely Facing the World and its Challenges. And I Say Yes I Have Taught in Spite of Living in a World Opened by Google.. Because I am a Teacher.... Yes I am a Teacher........ 

It Doesn't Matter How They Look at Me,  It doesn't Matter How Much More They Earn Than I Do.

It Doesn't Matter That They Drive While I Walk Because All What They Have is Through Me, A Teacher...

Whether They Acknowledge Me or Not......   I am a Teacher....

*This Message is Dedicated to All the Amazing Teachers , Lecturers And Professors .*

*You May Pass This Message to All the Teachers / Lecturers / Professors  If You Like And Make Them Proud  of Their Careers .*







:




: "या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं"

१.
दरवर्षी सर्व तुकड्यांमधून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शाळा पुढील वर्षाच्या सातही विषयांची पाठ्यपुस्तके, सात २०० पानी, सात १०० पानी वह्या बक्षीस म्हणून देत असे. तिच्या छोट्या हातात ते बक्षीस मावायचंही नाही. वर्ष बदलायचं पण हिचा पहिला नंबर चुकायचा नाही.  
तिच्या बाबांनी सांगून ठेवल्याप्रमाणे शिंदे सर एक मुलगी हेरून ठेवायचे. जिला शाळेचा खर्च परवडणारा नसायचा. पहिला क्रमांकाचा गौरव मोजून पाच मिनिटे मिरवला की ते बक्षीस सर म्हणतील त्या आपल्या वर्गमैत्रिणीला देऊन ही बाबांचे बोट धरून घरी यायची.
               एकेवर्षी दुपारी लेक निजल्यावर कौतुकाने तिच्या चेह-यावर हात फिरवून आई म्हणाली, एकदाही पोरीला बक्षीस घरी आणू देत नाहीत. बाबा म्हणाले, अगं हिचा शाळा खर्च मी करू शकतो, देवाने तेवढं दिलंय आपल्याला. तू एकदा नव्या को-या पुस्तकांना हातात धरणारी मुलं बघायला हवीस. त्यांचा फुललेला चेहरा पहायला हवास. शिवाय आपल्या लेकीला आतापासून कळायला हवं. गरजेपेक्षा अधिक मिळालं की त्याची हाव नाही धरायची. ते सत्पात्री दान करायचं.

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं
---------------******-----------------
२.
तो इंजिनिअर झाला. रग्गड कमावू लागला. त्याच्या हातात कला होती. कागदाला पेन्सिल टेकवली की उत्तमातून उत्तम चित्रे काढी. प्रमाणबद्धता, रंग, सौंदर्य अव्वल उतरे. तो कधीही चित्रकला शिकला नव्हता. पण त्याची चित्रे भल्याभल्यांना आवडून जात. लोकांना वाटे जादू आहे बोटांत. कुणीही त्याच्या घरी आले,  की भारंभार चित्रातले एखादे बेधडक उचलून "हे मी नेऊ?' विचारून घेऊनही जात. त्याचे एक्सिबिशन खच्चून भरे. दोन वर्षाकाठी एखादे प्रदर्शन पण लोक कौतुकाने येऊन चित्रे विकत घेत. आलेला सगळा पैसा त्याने कधी कुणाला कधी कुणाला वाटून टाकला. कारण विचारल्यावर सांगायचा, आई म्हणायची, तू इंजिनिअरिंग शिकून नव्हता आलेलास. खपलास, जागलास, मेहनत केलीस तेव्हा कुठे ती पदवी मिळाली. पदवीने पुरेसा पैसा दिला. चित्रकला मात्र देवाच्या घरून घेऊन आलास. ते तुझं मिळकतीचं नाही, ते तुझ्या आनंदाचं साधन. त्यातून मिळालेलं, ठेऊन काय करशील?

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं
---------------******-----------------

३.
ती लहान भावावर जवळजवळ खेकसत म्हणाली, तू पहिले तुझ्या अभ्यासाचं बघ! दरवर्षी कमी मार्क्स. परिक्षेच्या काळात रायटर म्हणून जातोस. आधी स्वतः उत्तम मार्क मिळव मग दुस-यांचा रायटर हो. त्याने गुमान मान खाली घातली. अभ्यास करत बसला. ताई निजल्यावर अलार्म बदलून ५ चा केला. पेपरच्या आधी अर्धातास हा सेंटरवर पोचला नाही की, तो याची वाट पहात सैरभैर होतो. ब्रेललिपीवरची त्याची बोटे टेन्शनने थरथरतात. ऐनवेळी रायटर आलाच नाही तर? या विचाराने केलेला अभ्यास विसरायला होतो. हे आता ह्याला ठाऊक झालं होतं. दरवर्षी कुणा नव्या अंध विद्यार्थ्याचा हा रायटर म्हणून जायचा. याला स्वतःला ४ मार्क कमी आले तरी समाधान खूप मिळायचं. त्याने ताईला एक दोन वेळेस सांगून पाहिलं, तू ही करून पहा. आपले डोळे फक्त ३ तास कुणासाठी वापरल्याने त्याचा विषय निघतो, तो वरच्या वर्गात जातो तेव्हा काय भारी वाटतं एकदा अनुभवून पहा..

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं

अक्षरांची एक वेगळी ओळख जी राहील आपल्या कायम लक्ष्यात

★   प्रथम बारा स्वर.   ★ 

अ =  अहंकार रहित रहावे.
आ = आरोग्यं धन संपदा.
इ = इडापिडा टळूदे.
ई = ईश्वराला विसरू नका. 
उ = उपरोक्त (जपाचा आग्रह असावा खानपानाच नसावा) 
ऊ = ऊसनवार (ऋणको नसावे)
ए = एकाग्रता वाढवा. 
ऐ = ऐकायला शिका. 
ओ = ओळखा मनं इतरांचे. 
औ = औपचारिकता सोडा. 
अं = अंधार दूर करा. 
अः = स्वतः विश्वास पात्र व्हा. 

★आता व्यंजने व अनुनासीकं ★

क = कणखरं व्हा. 
ख = खरं बोला, खरं वागा. 
ग = गतःकाल आठवावा. (गर्व होऊ नये म्हणुन)
घ = घराच घरपणं हरवू नका. 
ङ् = (अनुनासीकं) गङ्गे सारखे निर्मल रहावे. 
च = चमकावे. (चिरंजीव व्हा) 
छ = छळू नका कोणास. 
ज = जपं करा अखंड. 
झ = झटका मळभ मनातील. 
ञ् = (अनुनासीकं) चञ्चू प्रवेशाने असाध्य ते साध्य करावे. 
(आताची पिढि  "ञ् " ह्या अनुणाशिकाचा प्रयोग {मिञ} या शब्दात करितात, " मित्र " हेच योग्य आहे. उदा..चिञ्च, पञ्चा)
ट = टवटवीत रहावे. 
ठ = ठसा उम्टवा. (आदर्श व्हा) 
ड = डळमळू नका. ठाम रहा. 
ढ = ढवळाढवळ करू नका. 
ण् = (अनुनासीकं) (सुण्ठी प्रमाणे  आरोग्यदाई व्हा)
त = तलवार वापरा (धर्मरक्षणं आणि स्वरक्षणासाठी) 
थ = थकलेभागलेल्यांचा सहारा व्हा. 
द = दडपणं झुगारा. 
ध = धर्मवादी रहा. 
न् = (अनुनासीकं) सन्त व्हा. 
प = परमेश्वर, परमात्मा (एकरूप व्हावे)
फ = फजिती होईल असे वागू नका. 
ब = बरकत येईल असे कर्म करा. 
भ = भरकटू नका. (गुरु करा.) 
म् = (अनुनासीकं) परम्परांचे जतनं करा. मधूर व्यवहार करा. 
य = यमनियमांचे पालन करा. 
 (" र "ला "य" -या असा जोडतात बरेचं मित्र " र्य " असा चुकिचा प्रयोग करितात,. उदा..घा-या.,   फे-या.., घार्या किंवा फेर्या नाही.)
र = रक्षणासाठी सिद्ध असावे. 
ल = लगेच करा चांगले कर्म (विलंब नको) 
व = वरवरची आपुलकी नको. 
श = शत्रुला क्षमा करायला शिका. 
ष = षड्विकारांचा त्याग करा. 
स = सहानभूती असावी.(भूतदया) 
ह = हरिःस्मरणं करा. 
क्ष = क्षणभंगूर हे आयुष्य. 
ज्ञ = ज्ञाता हो. अज्ञ राहु नकोस. 
श्री = जेथे श्री तेथे लक्ष्मी.






 *... शिक्षकांच्या सुट्ट्या...*  
       
*...अलिकडे शिक्षकांच्या सुट्टी बद्दल खूपचं  बोललं जातं.बरेच लोक उलट-सुलट मतं व्यक्त करतात.    राष्ट्राची कुंडली मांडण्याचे काम  शिक्षक करतो असं  स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब म्हणत. खरतर उन्हाळी व दीपावली सुट्टी फक्त मा. न्यायाधीश महोदय व शिक्षक/प्राध्यापकांनाच असते.याच कारणही तितकचं महत्त्वाचं आहे. मा.न्यायाधीश महोदयांना एखादा निर्णय देताना बौद्धीक ताण असल्याने चूक झाली तर एखाद्याच्या आयुष्याचे  न भरून येणारे नुकसान होऊ शकते. म्हणून मा.न्यायाधीश यांना बौद्धीक विश्रांती मिळण्यासाठी या दीर्घ सुट्ट्या असतात.*          

*...शिक्षकांचंही अगदी तसचं असतं.राष्ट्राचे शिल्पकार शिक्षकांसमोर असतात. राष्ट्राचे आधारस्तंभ घडविताना शिक्षक हा प्रसन्न असला पाहिजे. त्याची बुद्धी तल्लखंच राहिली पाहिजे.त्याच्या बुद्धीला सतेज बनविण्यासाठी दीर्घ सुट्टाची व्यवस्था केली आहे.*                    

*...शिक्षकांचे स्वास्थ्य नीट न राहिल्यास केवळ व्यक्ती नव्हे तर अनेक पिढ्यांचं कधीही भरून न येणारं नुकसान होऊ शकतं .म्हणून मा.न्यायाधीश यांच्यापेक्षाही शिक्षकांना दीर्घ सुट्टीची गरज जास्त आहे.*                  

*...अलिकडे काही वरीष्ठ अधिकारीही दीर्घ सुट्टी मुलांना असते, शिक्षकांना नाही असे तारे तोडतांना दिसत आहेत.*                            

*...शिक्षक म्हणजे जणू गुलामंच .आमचे नोकरंच या भावनेनं बघणा-या लोकांपासून गुरू हा देवापेक्षाही मोठा असतो हा विचार कोसो दूर वाटतो.*                         

*...राष्ट्राची उंची ही देशातील शिक्षणाच्या व शिक्षकांच्या उंचीवर मोजली जाते. शिक्षकांकडे अनास्थेने पाहिल्यास फार मोठी किंमत नक्कीच मोजायला लागेल.*

*...विद्यार्थांसाठी शिक्षक हा त्याचं सर्वस्व असतो. विद्यार्थी बापाचं ऐकणार नाही पण शिक्षकांचा शब्द प्रमाण मानतो.*
       
*... स्व.जवाहरलाल नेहरू मुलांना म्हणत जगात सर्वात मोठा तुमचा शिक्षक असतो. अनेक शिक्षकांनी मला घडविल्यामुळे मी मोठा झालो.आई, वडील व शिक्षक यांचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण असतं.*      

*...शिक्षक सदाबहार, टवटवीत व रसरशीत राहायचा असेल,त्याची बुद्धी सतेज व तजेलदार रहायची असेल तर दीर्घ सुट्टी नक्कीच गरजेची आहे. म्हणून मायबाप सरकारला कळकळीची विनंती की सुट्टीत कोणतीही वारी,प्रशिक्षण अथवा शाळाबाह्य कामे लावू नका.*                     

*... कोणीही कृपया शिक्षकांच्या दीर्घ सुट्टीवर  टिप्पणी करू नये ही मनापासून विनंती.*        

*...राष्ट्रपती पदाची शपथ घेताना स्वखर्चानं आपल्या शिक्षकाला बोलावून घेणारे भारतरत्न डॉ कलामसाहेब म्हणूनंच पूजनीय वाटतात.
*पेंधे पी पी*

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
*दुसरी महत्त्वाची बाजू*
🙏🙏🙏🙏🙏🙏


शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी आहे असा प्रचार करणारांच्या निदर्शनास खालील गोष्टी आणून द्याव्यात..
–----------––---------------------------------------------------------------

1) शिक्षकांना उन्हाळी व दिवाळी या दीर्घ सुट्ट्या असतात इतर कर्मचाऱ्यांना त्या नसतात. परंतु इतर कर्मचाऱ्यांना वर्षातला एक महिना रजा असते ती शिक्षकांना फक्त 10 दिवस असते.

2) इतर कर्मचारी आपल्या रजा साठवून सेवनिवृत्तीच्या वेळी त्यांचे रजा रोखीकरण करू शकतात म्हणजे त्यांच्या शिल्लक रजेचे पगारात रूपांतर करून 10 महिन्यांचा पगार मिळतो. शिक्षकांना अशी रजा रोखीकरणाची सुविधा नाही..

3) इतर शासकीय कर्मचाऱ्यांना दुसरा व चौथा शनिवार सुट्टी असते ती शिक्षकांना नसते 

4) आणि या सुट्ट्या शिक्षकांना उपभोगू दिल्या जात नाहीत त्यातही प्रशिक्षणे, शाळेची कामे असतात.
5 )इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात 2 शनिवार प्रमाणे वर्षाच्या 24 दिवस सुट्ट्या असतात
6)इतर कर्मचारी इतर मार्गाने इमले प्रॉपर्टी जमवतात जी शिक्षक जमऊ शकत नाहीत
7)शिक्षक हा पूर्ण वेळ कार्यालयात असतो.



धन्यवाद !








 शिस्त आणि विद्यार्थी यावरील लेख*.
**फक्त शिक्षकांनाच दोष देऊ नका*
विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा.        ब-याच वेळा शिक्षक- पालक यांच्या नात्यावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.*
५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले,मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाहीत उलट विद्यार्थी आई - वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा झाली किंवा मला मारले कारण वडिलांचा अजून मार बसायचा. तुला शिक्षा झाली म्हणजे तू चुकलाच असेल ही धारणा पक्की होती. याचा परिणाम असा झाला होता की शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदर होता. *शिक्षक हेच सुधारण्याचे प्रवेशद्वार यावर पालकांची श्रद्धा होती*. त्या काळात शिक्षक ही तसेच होते . अशा *शिक्षकांमुळे आपण सारे घडलो* आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपल्यालाच म्हणजे स्वतःला सोडवायच्या असतात. आपले आई-वडील शाळेत येऊन शिक्षकांशी बोलणार नाही, समस्या सोडवणार नाही. . यामुळे नियमबाह्य कामच करू नका. .चुकीचे गैरवर्तन करू नका. हे शिक्षकांच्या धाकामुळे शक्य झाले जे पुढे आयुष्यात नोकरी-व्यवसाय करताना खूप उपयोगी पडले.
शाळेतील नियम पाळल्यामुळे ऑफिसमध्ये वेळेवर जाण्याची सवय लागली. 

आजकालचे पालक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसून शिक्षकांशी चर्चा (वाद) करायला येतात आणि ही चर्चा चालते त्या मुलांदेखत. जिथे मुलांच्या मनाला समजते की आई-वडील हे आपल्या प्रत्येक समस्या सोडवतील (समस्या या समस्या नसून बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे गैरवर्तन असते पण ते त्याला कधीच मान्य नसते.) आई-वडील आपल्या वर्तणुकीला    सपोर्ट करता बघून त्यांचे सुधारण्याचे मार्ग हळूहळू कमी होत जातात. हे त्या मुलाला समजत नसते किंबहुना हे समजण्याचे वयच नसते पण पालकांना समजत असते मात्र  आंधळया प्रेमापोटी ते समजण्याच्या मनस्थितीत नसतात.

50 वर्षांपूर्वीचे शिक्षक हे खरे गुरुजी होते. त्यानंतर गुरुजी हळूहळू कमी होत त्यांच्यातले उरलें कडक शिक्षक. . 
या कडक शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम अतिसंवेदनशील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ लागला. 
1990 नंतरच्या म्हणजेच पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे शिक्षक होते त्यांच्याकडून अति कडक शिस्त आणि शिक्षा यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात सुरू झाले.
याच दरम्यान ग्लोबलायझेशन नुकतेच आले होते. पालकांची मानसिकता बदलत होती.. भौतिकवादाकडे आपण चालायला सुरुवात झाली आणि अतिमहत्त्वकांक्षा, हव्यास अशी चुकीची मूल्ये  समाजात रुजायला लागली.
*पास-नापास यांचा गंभीर प्रश्न समाजासमोर यायला लागला.* नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढले. "शालेय परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास", या एका विचारामुळे विद्यार्थ्यांंमध्ये नैराश्य वाढत गेले. 
याच दरम्यान शिक्षणाचा कायदा आला. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा करणे हा गुन्हा ठरवला. आठवीपर्यंत नापास करता येणार नाही अशा तरतुदी आल्या यामुळे कडक शिक्षकांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदल झाला. बरेच शिक्षक रिटायरमेंट स्टेजलाच होते. 2001 नंतर शिक्षकांची नवी तरुण पिढी यायला लागली. पण या दरम्यान पालकांच्या मानसिकतेमध्ये फार बदल झाला होता. येत्या दहा वर्षांमध्ये भौतिकवाद  समाजात प्रचंड  रुजला. *जिंकणे हेच सर्वस्व मग भले ते कुठल्याही मार्गाने मिळो हा संस्कार पालकांमध्ये घट्ट रुजला* आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला. पालकांमध्ये आपल्या मुलाबद्दल अति महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या. एकुलते एक बाळ. . त्याला हव्या त्या गोष्टी पुरवणे. . त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे.. हे पालकांचे आद्य कर्तव्य झाले. याच दरम्यान पालक आणि विद्यार्थी सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही या सर्व गोष्टीत अडकले. मैदानी खेळ नाही, अति स्क्रीन टाइम यातून मुलं हट्टी बनत गेली. *मागितले तर मिळते हा संस्कार अधिक रुजला.* चंगळवादामुळे पालकांमध्ये मूल्य-संस्कार याचे महत्व कमी झाले. *याचा महत्त्वाचा परिणाम शिक्षकांबद्दलचा सन्मान कमी झाला. *प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेतली जाते अशा खोट्या समजुतीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान व्हायला सुरुवात झाली.* अति लाडा मुळे म्हणा किंवा अतिमहत्त्वाकांक्षी पणामुळे म्हणा किंवा शिक्षण कायद्याचा गैरवापर म्हणा पालक छोट्या-छोट्या कारणांसाठी शिक्षकांशी वाद घालू लागले. 

आईने मुलाच्या संपूर्ण अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली. १०० पैकी १०० मार्कांसाठी मुलांच्या अभ्यासाच्या चुकांपासून शिक्षकांच्या चुका काढण्यापर्यंत सर्व ती करू लागली. *पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फक्त शिक्षक कसे चुकीचे होते आणि माझी मुलगी/ मुलगा कसा योग्य आहे आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही यावरच चर्चा रंगू लागल्या.* येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब  होऊ लागला. *त्यात हायपरऍक्‍टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला.*

शिक्षण कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसले. शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो.
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या. तशी स्कूल डायरी मध्ये नोट्स येते. टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी. . तू स्वतःहून बोलू नकोस. . प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते.. अशी कशी टीचर बोलत नाही पाहू. 

म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायचीच नाही पण शिस्तीची अपेक्षा शाळेकडून नेहमी ठेवायची. *विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात, जबाबदारीसुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही.* शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे करण्याच्या  प्रक्रियेमध्ये शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात. मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनपण  करणार नाहीत पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो. *विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही.* असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे. . कुणीही  शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात . *ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे पण विद्यार्थ्यांची धारणा होऊन जाते की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. *या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येत राहते.* मारणं हे अयोग्यच  त्याला मी काय कोणीही समर्थन करणार नाही पण वर्गात रागावणं सुद्धा आजकाल बंद झाले आहे त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. जी सर्वंगीण विकासासाठी आवश्यक आहे. 

काही झाले की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात. या सर्व संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझी आई. त्याच्या प्रत्येक (चुकीच्या) निर्णयांमध्ये आई सहभागी होते. ती स्वतः निर्णय घेते. . ती इतकी involve होते की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास ती स्वतः पूर्ण करते. पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकतो. स्वावलंबनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात ते ती विसरून जाते. ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून मुलांसाठी आपण Ready made answer देत होतो. 

जिथे पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे. . जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत जातो आणि त्याचे शैक्षणिक समस्याचे प्रमाण वाढत जाते.

काही पालक खास करून आया आपल्या बद्दल नेहमी असमाधानी असतात. पालकत्वाची A B C D सुद्धा माहित नसलेल्या या आया शिक्षकांसमोर माझं मूल कसं मूर्ख आहे, त्याला कसं कळत नाही आणि या सर्वाला एकमेव टिचरस कसे जबाबदार आहे हे मोठ मोठ्या आवाजात दहा पालकांसमोर बडबडत असतात. *अशा पालकांच्या पाल्याचे भविष्याबद्दल खरच चिंता वाटते कारण असे पालक समजून घेण्याच्या पलीकडचे असतात.* काही पालक तर मुख्याध्यापकांकडे हट्ट धरतात की शिक्षकांना बोलवा आणि माफी मागायला लावा. यातून टीचेर्सचे मनोधैर्य कमी होते. ते शाळेतील एक्स्ट्रा कामे करायला कंटाळा करतात. शिक्षकांकडून उत्तम कामाची अपेक्षा असेल तर त्याचे कौतुक होणेही गरजेचे असते खास करून ज्या शाळा फक्त अभ्यास शिकवण्याचे कार्य करत नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची धडपड करत असतात आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन अॅक्टिविटीचे आयोजन करत असतात. अशा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उत्तम नियोजनाबरोबर शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य हळूहळू कमी होते. 

*या काही कुरकुरे पालकांमुळे शिक्षकांचा उत्साह कमी होतो.* प्रत्येक शाळेत असे कुरकुरे पालक असतात त्याचे प्रमाण दहा टक्के पण नसते पण त्यांच्या चुकीच्या संवादामुळे, चुकीच्या पालकत्वामुळे, चुकीच्या अपेक्षेमुळे शाळा व्यवस्थापनाशी वाद होतात. 90% पालक हे शाळेबद्दल नेहमी आनंदी असतात पण ते बघ्याची भूमिका घेतात. शिक्षकांना कौतुक करण्यात ते कंजुषी करतात आणि मग हे 10% पालक अतिशय उद्धटपणे विषय हाताळतात. सोशल मीडिया, वृत्तपत्र यांना चुकीच्या माहिती देऊन बातम्या प्रसिद्ध करतात. व्यक्ती/संस्था जेवढी मोठी तेवढ्या तिखट-मीठ लावून बातम्या रंगवल्या जातात.. या सर्वांची सुरुवात झालेली असते ती म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षा अति अपेक्षा चुकीच्या पालकत्वाच्या या बीजातून. 

कालच बातमी वाचली नाशिकमध्ये एक पाचवीचा विद्यार्थी दोन दिवस शाळेत आला नाही म्हणून शिक्षकाने आईला फोन करून सांगितले. आई म्हणे तो रोज शाळेत जातोय. आईने मुलाला विचारले, तेव्हा तो कबूल झाला मी शाळेत जातो सांगून घरातून निघतो पण शाळेत जातचं नाही. तो वाईट मुलांच्या संगतीत लागला होता. म्हणून आईने त्याला दोन फटके दिले. आईने मारले याचा राग आला म्हणून त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आता या घटनेला कोण जबाबदार? शिक्षक.. ज्याने काळजीपोटी मुलगा शाळेत येत नाही म्हणून फोन केला का आईने त्याला पहिल्यांदाच मारले का तो स्वतः विद्यार्थी ज्याला राग सहन होत नव्हता. आईने आधीपासूनच शिस्तीला महत्त्व दिले असते, चुकले की रागवले असते, शाळेचे नियम हे भविष्य चांगले करण्यासाठीच असतात हे जर पहिलीपासून मनावर बिंबवले असते तर आज ही वेळ कदाचित आली नसती.

*पालकांनो शिस्त ही प्रेमाची पहिली पायरी  आहे.* शिक्षकांना त्यांची कामे करू द्या. *शाळेचे छोटे छोटे नियम पाळावेच लागतात कारण त्यातून मोठेपणी भारतातील कायदे पाळण्याचे संस्कार रुजत असतात.* शाळेत थोड्या उशिरा पोहोचल्याने त्यांच्यामध्ये वेळेचे व्यवस्थापनाचे महत्व कमी होते याचे साधे ज्ञानसुद्धा आजकाल पालकांना नसते. आजकालची मुलं अति लाडा पोटी बिघडत चालली आहे त्यांना कोणाचीच भीती उरली नाही. त्यांची वाढ अशीच झाली तर पुढे ते आई-वडिलांची झोप उडवू शकतात म्हणून शाळा शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे. शाळेत होणाऱ्या ओपन हाऊस, पालकांच्या मिटींगला शिक्षकांशी सन्मानांनी बोलणे, त्यांना समजून घेणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकमेकांना आदर आणि सन्मान जर राहिला तर त्या विद्यार्थ्यांना योग्य रुळावर आणणे सोपे जाईल. 

*जिथे शिक्षकांचा सन्मान होत नाही तिथे समाजाची प्रगती खुंटते आणि देशाचे नुकसान होते.*😊🙏🏻

  लेख फारच छान आणि प्रखर सत्य मांडणारा आहे म्हणून आपणही forward करा🙏 )






गाणे मुळाक्षरांचे*

कमळातील क पाण्यातच राहिला
ख चा खटारा आम्ही नाही पाहिला
      ग च्या गळ्यात घालायची माळ
      घ च्या घरात रांगते बाळ
च च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊ
छ ची छत्री घेऊन पावसात जाऊ
      ज च्या जहाजात बसू कधीतरी
     झ च्या झबल्यात दिसेल न मी परी
ट चे टरबूज गोल गोल फिरते
ठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते
     ड चा डमरू वाजे किती छान
     ढ चे ढग वाटे कापसाचे रान
न च्या नळावर पाणी पिऊ चला
ण चा बाण कसा आभालात गेला
    त च्या हातामध्ये मोठी तलवार
    थ चा मोठा थवा जाई दूर फार
द च्या दरवाजात आहे कोण उभा
ध च्या धरणात पाणी किती बघा
     प चा पतंग ऊंच ऊंच फिरे
     फ च्या फणसात गोड गोड गरे
ब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मान
भ चे भडंग लागते छान
      म म मगर ही पाण्यातच राही
      य यमक कवितेत येई
र च्या रथाला चार चार घोडे
ल चे लसून भाजीत टाकू थोडे
      व च्या वजनाचे आकारच वेगळे
       श चे शहाम्रुग मोठे मोठे बगळे
ष च्या षटकोनाला बाजू कोन सहा
स च्या सशाचे मोठे कान पहा
       ह चे हरिण चाले तुरू तुरू
      ळ च्या बाळाला नका कोणी मारू
क्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीर
ज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर 
       पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे
       चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे



*टाइमबँक*

          स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका  ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.

          मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते. सामाजिक कल्याण विभागाच्या. त्याच्यि घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

          एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरघ पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम  आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.

          सध्या स्वित्झर्लंडमध्ये *टाइमबँक*हा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत. समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे. बहुसंख्य स्वीस नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे. शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.

          ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची अति ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रस्रुत करण्याचा प्रयत्न केला पण सर्व काही फक्त *शासनानेच*करावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली. आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ वकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने व्रुध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय व्रुध्दांचे भवितव्य उज्वल असेल.

*बघा विचार करुन*




.
 डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.*

---------------------------------------------
👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्दत मात्र वेगळीच असते. ख-या जगात हरणार्‍याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. ख-या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
👍 नियम १० – स्वप्न ते नाहीत जे तुम्ही रात्री झोपेत बघतात , स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही ।






*....शिक्षक म्हणून माझी जबाबदारी....*

शाळा माझी,सर्व माझीच मुले,
टवटवीत ठेवीन,जशी फांदीवर फुले,
कुरवाळेन प्रेमाने आईपरी,
दक्ष डोळे मात्र असतील सदैव खुले....

वैविध्यपूर्ण उपक्रमांची करेन बरसात,
रमून जातील मुले शाळेच्या अंगणात,
झटेन थोडासा,काहीसा झिजेनही,
चंदनापरी दरवळेन त्यांच्या जीवनात....

मुलांना देईन संगीत-कलेचीही जाण,
अभ्यासासोबत खुले असेल मैदान,
रुजवेन त्या निरागस मनात,
पर्यावरण,निसर्गाचे जागरूक भान.....

देईन मुक्तता अभिव्यक्त होण्याची,
लावेन सवय विचार करण्याची,
आनंददायी वातावरणात,
सदैव संधी मनसोक्त बागडण्याची....

वेळेत स्वतः हजर राहीन शाळेला,
वक्तशीरपणाचे संस्कार वेगळे कशाला?
ध्यास गुणवत्तेसह संवेदनशीलतेचा,
मनात माझ्या सतत कल्पक विचारमाला

*शिक्षक दिनानिमित्त   खूप खूप शुभेच्छा...*
😊🌷🌼💐🌸🌹🌺🥀😊




 याला म्हणत्यात संदेश... आता करा बिनधास्त शेयर... कुणाच तरी नक्कीच भल होईल।

*चमत्कार!* *चमत्कार!!* *चमत्कार !!!*

बीड   जवळील एका गावामध्ये *अभ्यास* करण्याचा चमत्कार. 
गावच्या वाचनालयात एक मूलगा *अभ्यास* करीत होता.
वाचन करताना त्याने *स्वामी विवेकानंद ,शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर,   तसेच शिवरायांचे शैक्षणिक विचार वाचले व मुलाने मन लावून अभ्यास केला व तो मुलगा  JUDGE(जज)* झाला व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या व तो आता चांगले जीवन जगतो आहे. त्या मुलाने ही गोष्ट त्यांच्या मित्रांना सांगितली व त्याचे मित्र सुद्धा चांगले मार्क्सने पास  झाले काही मित्रांनी हे खोट समजलं  ते पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते बनले आहेत.नंतर वडापावच्या गाड्यावर काम करतायेत.
*त्याच गावांमधल्या अनेक तरुणांनी अभ्यास करून पोलीस भरतीची तयारी केली असता आज अनेक  तरुण पोलीस झाले* 
तसेच 
मनमाड येथील एका मुलाने ही गोष्ट ऐकून *अभ्यास* केला तो आता पुणे येथे class2 च्या पोस्टवर आहे...

*चांदवड  येथील एका बेरोजगार युवकांना हा msg कळला त्यांनी अभ्यास केला व त्यांना  सरकारी नौकरी लागली*. 
*तेव्हा त्याने अभ्यास करण्याचा संदेश 10 जणांना पाठविला*.एका झोपडपट्टि मधील  बाईने हा मेसेज वाचला तीने आपल्या लहान मुलाला अंगणवाडी मध्ये पाठवले तो लगेचच क ख ग / A B C D  बोलायला लागला .

*एका माणसाने हे खोटे आहे असे समजले तर त्याचा मुलगा निरक्षर झाला व आता भंगार गोळा करतोय*. 

हा मेसेज डीलेट करू नका.
*Knowledge is power*

हा मेसेज १० जणांना पाठवा उद्या संध्याकाळ पर्यंत अनेक जण अभ्यासाला लागतील. ...
           
*शिका रं बाबा ओ शिका!*
📚📖👌📖📚
!! अंधश्रध्दामुक्त परीवार !!
[



 *जातिवंत अधिकारी / कर्मचारी असाल तर हा संदेश संपूर्ण वाचा आणि किमान एका समुहात पुढे पाठवा*
🎪
*नेहमी सकारात्मक विचार मांडा व सकारात्मक रहा.*
🏕
*कोणतेही काम हातात घेणे पुर्वीच तक्रारी, अडचणी मांडू नका.प्रत्यक्ष काम सूरू करून मगच समस्या सांगा*
🏬
*1* कार्यालयात वेळेवर हजर रहा.
*2* कार्यालयातून घरी जाण्याची घाई करू नका. 
*3* पूर्ण वेळ काम करा.
*4* कामाची गुणवत्ता दररोज तपासा.
*5* गणवेश आग्रही ठेवा.
*6* कामात सातत्य ठेवा.
*7* निमित्त सांगणे बंद करा.
*8* उणिवांवर पाणी सोडा.
*9* अधिका-यांकडून सहकार्य मागत रहा.
कामाची गुणवत्ता समोर मांडा.
*10* आपण फक्त नोकरी करत
आहोत म्हणुन कार्य करू नका.निव्वळ पाट्या टाकण्यासारखे काम नको .
*11* फक्त कामाचा विचार करा.
*12* जाऊदे म्हणणे सोडा.
*13* व्यवस्था ढासळली आहे म्हणून
आपण ढासळू नका.
*14* *विशिष्ट प्रकारचा वर्ग/ ग्रुप (lobby) तयार करू नये अन्यथा कामात अडथळा होऊ शकतो ते स्वीकारा -मान्य करा.... विशिष्ट वर्गाचा अट्टाहास धरू नका* 
*15* टाईमपास थांबवा कार्यालयात नुसता वेळ घालवायला मोबाईल वापरू नका. मोबाईलचा वापर कामाचे साधन म्हणून करा. 
*16* कोणी चुकून कामे करा असे सांगीतले म्हणून रागवू नका.

*17* कामांकडे अधिक लक्ष द्या . ते आहेत म्हणून आपल्याला एवढा पगार मिळतो याचे कायम भान ठेवा. 
*18* फक्त आपणच कार्यालय उज्ज्वल करू शकता हे विसरू नका.
*19* आपण कामचोरपणा करू नका . आपल्या आजूबाजूचे कामचोर सुधारा.
*20*. *कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया . नावे ठेऊ नका सहकार्य करा.*
*21* मला माफ करा म्हणायला शिका.
*22*.काम करणार्यांना फूस लावू नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा...तुम्हीही सुशिक्षित आहात हे कदापि विसरू नका...
*23*.वरिष्ठांचा आदर करा...(वयाने आणि नियुक्तीने असलेल्या)
*24* *खरे ते स्वीकारा -मान्य करा....माझे तेच खरे असा अट्टाहास धरू नका..*
*25*.आपला अमूल्य वेळ दुसऱ्यावर टीका करण्यात घालवू नका
*26* कोणत्याही चांगल्या अधिका-याची जागा घ्यायची आहे. त्याच्या सारखा मान मिळवायचा आहे. तर त्याच्या सारखे कृत्य करा. त्याच्या चुग ल्या करून नव्हे तर त्याच्या मार्ग दर्शनात पुढे जा.
*27*.सहकार्यांविषयी जाणीवपूर्वक गैर समज पसरवू नका.. मीच हुशार या भ्रमात राहू नका.
 *28*चांगल्या काम करणाऱ्या कर्मचारी /आधिकारींचा आदर,सन्मान  करा,त्यांच्या कामकाजाच्या कार्य पद्धती चा अवलंब करा,विनाकारण त्यांना उपरोधीक टोमणे मारु नका.
*29* गतिमान प्रशासन ,स्वच्छ प्रशासन ,लोकाभिमुख सेवा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर राहीले पाहीजे,यामध्ये हयगय करणाऱ्या वर वरिष्ठांनी शिस्तीचा बडगा दाखविणे त्यांचे कर्तव्ये आहे,त्यामुळे त्यांच्या वर नाराजी व्यक्त करून टिका टिप्पणी करून कार्यालयाचे वातावरण बिघडवु नका.
*30*आपल्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकांचे स्वागत हसतमुखाने करा,त्यांची अडचण ,काम समजुन घ्या ,सबंधितांना भेट घ्यायला सांगून योग्य मार्गदर्शन करा,त्यांचे काम कमी वेळेत ,कमी श्रमात होईल सर्व सबंधितांनी कार्यरत रहा.
*31*विभाग,संस्था ,कार्यालय ची प्रतिमा जनमानसात चांगली राहील यासाठी प्रत्येकाने कर्तव्य तत्पर राहवे.
*32*सरकारी काम वेळच्यावेळी पुर्ण करा,ताणतणावात राहु नका,तब्बेत्तीला  जपा,काळजी घ्या,कुटुंबाची काळजी घ्या,अनावश्यक खर्च टाळा,शारीरिक ,मानसिक ,कौटुंबिक ,सामाजिक व कार्यालयातील स्वास्थ टिकविण्यासाठी योग्य ,पुरेसा आहार व व्यायाम करून कार्यक्षम राहवे

No comments:

Post a Comment

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...