Thursday 21 November 2019

एक अनोखी व संस्मरणीय सांस्कृतिक देवाणघेवाण

🌎🌎🌎👨‍❤‍👨
*CULTURAL EXCHANGE PROGRAMME*


           *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथे सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत युरोपमधील बेल्जियम देशातील सेंट लॅम्बर्ट नस येथील 30 शालेय विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या शिक्षिका मिस मर्लिन, मिस क्रिस्टीन , मिस लिसा यांनी भेट दिली. दिवसभर वेगवेगळ्या माध्यमातून दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी विचारांची ,संस्कृतींची, देवाणघेवाण केली.* 
           *सकाळी 9 वाजता बेल्जियम मधील मुलामुलींचे आगमन झाले . शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व झांज पथकाच्या द्वारे स्वागत केले. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कुंकम तिलक व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.  सुरवातीला दिवसभराच्या वेळेचे नियोजन करण्यात आले. औपचारिक स्वागत झाल्यानंतर चिखली शाळेतील विविध उपक्रमांची माहिती पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे दाखवण्यात आली. विविध प्रश्न विचारून सर्व मुलांना बोलते करण्यात आले , ज्ञारचनावादी शालेय वर्ग रचना , शालेय बाग पाहून सर्व विद्यार्थी खुश झाले. भारतीय शिक्षण पद्धती तील महत्वाच्या बाबी मुलांनी जाणून घेतल्या व मुलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.*
           *दुपारच्या सत्रात गावातील जीवनमान पाहण्यासाठी मुलांचे पाचचे गट करण्यात आले, प्रत्यक्ष गटाने घरात जाऊन घरांची रचना, आहार, पोशाख, चालीरीती, परंपरा जाणून घेण्याच प्रयत्न बेल्जियम मधील मुलांनी केला. यावेळी चुलीवर भाकरी करण्याचा तसेच जात्यावर दळण दळण्याचा अनुभव मुलींनी घेतला.*
         *त्यानंतर निघाली शिवारफेरी , प्रत्यक्ष गावातील शेतांमध्ये जाऊन शेतीविषयक माहिती संकलित करण्यात आली . स्ट्रॉबेरी, वांगी, टोमॅटो, मिरची यांची लागवड प्रत्यक्ष पाहण्याचा योग या मुलांना मिळाला . शेतामध्ये एका ठिकाणी भात झोडणी चालू होती, त्याठिकाणी या मुलांनी प्रत्यक्ष भातझोडणी केली.  यावेळी सर्वांनाच विलक्षण समाधान वाटले. बेल्जियम मध्ये ही स्ट्रॉबेरी मोठया प्रमाणात होते ,तेथील शेतीपद्धत तसेच फळ पिकांची माहिती आमच्या मुलांना त्यांनी सांगितली.सुरवातीला नकार देणाऱ्या या मुलांनी तुती,काकडी यांसारख्या फळांवर चांगलाच ताव मारला.*
          *शेवटच्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. छोटासा खेळ खेळल्यानंतर सुरवातीला चिखली शाळेतील मुलांनी चार कार्यक्रम सादर केले , लावणी नृत्याला त्यांनी खूप दाद दिली, त्यानंतर बेल्जियम मधील मुलांनी त्यांचे तीन नृत्याचे कार्यक्रम सादर केले शेवटचा कार्यक्रम थीम गाण्यावर एकत्रित दोन्ही शाळेतील मुलांनी सादर केला, सांस्कृतिक कार्यक्रमात खूपच धमाल आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवट दोन्ही देशांच्या राष्ट्रगीत गायनाने झाला.*
        *समारोपाच्या सत्रात बेल्जियम शाळेने शिवाजी महाराजांची प्रतिमा  , तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. आमच्यवतीने स्वामी विवेकानंद यांची मूर्ती भेट देण्यात आली. आभार प्रदर्शन झाल्यानंतर निरोपाची वेळी बेल्जियम मधील मुलांनी स्वतःचे मेल id दिले व सदैव संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.हे विश्वची माझे घर हा उच्च हेतू मनांमद्ये ठेवून एकमेकांना समजावून घेऊन एकत्र येण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयोगी पडेल. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी चिखली गावातील सर्वच ग्रामस्थ , शाळा व्यवस्थापन समिती, युवक मंडळ, माजी विद्यार्थी यांनी उत्तम सहकार्य केले .*

 *शब्दांकन*
 *श्री. विष्णू ढेबे*
*पदवीधर शिक्षक*
*जि. प. शाळा चिखली*
www.vishnudhebe.blogspot.com

No comments:

Post a Comment

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...