वाचनीय लेख

 *बिलीफ सिस्टीम !*
           


            शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्‍या लोकांच्या मेंदुत एखादी स्पेशल चीप बसवलेली असते का? जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डीनरी बनवते?

धीरुभाई अंबानी म्हटलं की काय आठवतं?  – पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती!
तेच जेआरडी टाटा म्हटलं की - पैशासोबतच सचोटी, दानशुरपणा आणि मुल्यांची जपणुक!
स्टीव्ह जॉब्ज म्हणजे – गॅझेटच्या जगातली क्रांती!
तेंडूलकर किंवा अमिताभ म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम!
जगाला प्रदुषणमुक्त करण्याचं स्वप्न बघणारा निकोल टेस्ला माहितीये?
जगप्रसिद्ध व्हर्जिन ग्रुपचा मालक ‘रिचर्ड ब्रॅन्सन’? बारा बारा उद्योगामध्ये एक नंबरवर असलेला हा माणुस तुम्हाला नेहमी समुद्रकिनार्‍यावर मजा करताना दिसेल!
ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं ह्याचं कारण काय?
ह्या लोकांकड़े असं काय वेगळं होतं,जे इतर लोकांकडे नव्हतं!
बिलीफ सिस्टीम!

तुम्हाला त्या पायाला दोरखंड बांधलेल्या हत्तीची गोष्ट माहितीये? त्याच्या मनावर लहानपणापासुन बिंबवलेलं असतं, की तो दोरखंड तोडू शकत नाही, आणि हा जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी शेळी बनुन जगतो, केवळ त्याच्या बिलीफ सिस्टिम मुळे!

आपल्या आयुष्यात आलेली संकटं, अपयशं आपल्याला असं भासवतात, की आपण दुर्बळ आहोत, पण आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचा प्रचंड साठा आपल्या मनात आणि शरीरात दडलेला असतो.
बिलीफ सिस्टीमचं एक उदाहरण देतो,
समजा, तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी एका कार्यक्रमात गेला आहेत, जेवणे चालु आहेत वाढण्यात तुम्हीही त्या परिवाराला मदत करत आहात आणि कोणीतरी सांगतं,
“जा बरं, किचनमधुन तेवढं मीठ घेऊन ये!”
तुम्ही किचन मध्ये जाता, पण मनात विचार येतो, “इथे मी नवीन आहे,मला यांच्या घरातलं मीठाचं भांडं कसं सापडेल, बरं?”

अस्ताव्यस्त किचनमध्ये आपल्याला ते मीठाचं भांडं दिसतच नाही, आपण रिकाम्या हाताने वापस आलेलं पाहुन ती व्यक्ती म्हणते, “अरे समोरचं तर ठेवलेलं आहे, ”आणि आपल्या हाताला धरुन ती किचन मध्ये येऊन भांडं दाखवते, आणि मीठाचं भांडं एकदम समोरच असतं,”
आपल्याला ते आधी सापडत नाही कारण आपण स्वतःला ऑर्डर दिलेली असते, की “मला ते सापडणार नाही आणि आपलं अंतर्मन अगदी तसचं घडवतं.”

बिलीफ सिस्टीम माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवते किंवा त्याची तरी धुळधाण करते,
चांगली बिलीफ सिस्टीम म्हणजे, ‘माझ्याकडे काय नाही’,  हे न पाहता, ‘माझ्याकडे काय काय आहे?’ याचा विचार करणं!

रजनीकांत कंडक्टर होता, त्याच्याकडे हिरोसाठी लागणारा गोरागोमटा, लोभस चेहरा नव्हता, पण त्याच्याकडे स्टाईल आणि डायलॉग डिलीव्हरी होती, त्याने त्याच्यावर फोकस केला आज तो जगातला असा एकमेव अभिनेता आहे. ज्याचे पिक्चर जपानमध्येही हाऊसफुल होतात.

अमिताभला सांगण्यात आलं होतं, तुझी उंची तुझा हिरो बनण्यातला अडसर आहे. अनेक रिजेक्शन नंतरही अमिताभ निराश झाला नाही त्याने स्वतःला विचारलं माझ्याकडे काय चांगलं आहे? त्याने असा काही आवाज कमवला दोन मिनीटांच्या निवेदनासाठी आज त्याला करोडो रुपये ऑफर होतात.

जेफ बेजोस असो वा जेक मा,
स्टीव्ह जॉब्ज असो वा बिल गेटस.
नारायण मुर्ती असो वा नरेंद्र मोदी.
दिपीका पदुकोन असो वा माधुरी दिक्षीत.
महेंद्रसिंग धोनीपासुन संदीप महेश्वरी पर्यंत.
स्वामी विवेकानंदांपासुन, विवेक बिंद्रांपर्यंत.
कोणतही, तुमच्या फेव्हरेट असलेलं कोणतंही कॅरॅक्टर तुमच्या डोळ्यासमोर आणुन बघा,
त्याच्या यशाचं उत्तर तुम्हाला त्याच्या बिलीफ सिस्टीममध्ये सापडेल.

तर मित्रांनो,
यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या बाबतीतही ही बिलीफ सिस्टीम आपल्याला एकतर खुप मदत करते, किंवा आपल्या मार्गात आडवी येते,
ज्याचा बिलीफ खुप सशक्त आहे, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात चमत्कार घडवु शकते.
असे कित्येक अविश्वसनीय चमत्कार मी माझ्या आयुष्यात कित्येकदा अनुभवले आहेत,
आणि रोज कित्येक जणांसोबत ते घडतानाही पाहतो आहे,

तुमची बिलीफ सिस्टीम कशी आहे? ती तुम्हाला साथ देते की नाही?

का तीच्या मागे तुम्ही फरफटत जात आहात?
लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्वलायजेशन, स्वसंमोहन, अफर्मेशन अशा अनेक पद्धती माणसाचा बिलीफ सिस्टीम बदलवण्यासाठी उपयुक्त आहेत.
बिलीफ सिस्टीम ला मजबुत करण्यासाठी,आपल्या स्वप्नांच्या पंखांना अतुट विश्वासाचं बळ देण्यासाठी, उत्तम जाणकार व अभ्यासु समुपदेशक मोठी मदत करू शकतात.

तुमची बिलीफ सिस्टीम उतुंग भरारी घेवो यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा !....

ज्याची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग...
त्याला या जगात अशक्य असे कांहीच नाही...





: टाटा स्टीलच्या चेअरमननी एकदा टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांची एक आढावा बैठक जमशेदपूर मध्ये बोलावली होती.

या बैठकीत एका कामगाराने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणाला की, कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहांची स्थिती अनारोग्यदायी व अत्यंत निकृष्ट असून अधिकाऱ्यांसाठीच्या स्वच्छतागृहांची स्थिती मात्र नेहमीच आरोग्यदायी व सर्वोत्तम असते.

चेअरमन महोदयांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला, ही स्थिती सुधारण्यासाठी किती काळ लागेल, असे विचारले. तो म्हणाला, 'यासाठी एक महिना पुरेसा आहे.'

यावर चेअरमन म्हणाले, 'मी हे एका दिवसात करतो. सुताराला बोलवा.'

दुसऱ्या दिवशी सुतार आल्यानंतर त्यांनी त्याला दोन्ही स्वच्छतागृहं वरच्या पाट्या काढायला लावून त्यांची अदलाबदल करायला सांगितले. अधिकाऱ्यांच्या स्वच्छतागृहावर 'कर्मचाऱ्यांसाठी' अशी तर कर्मचाऱ्यांसाठीच्या स्वच्छतागृहावर 'अधिकाऱ्यांसाठी' अशी पाटी लावण्यात आली. आणि या पाट्या दर पंधरा दिवसानंतर बदलण्याची सूचना केली.
पुढील तीन दिवसातच दोन्ही स्वच्छतागृहांची स्थिती सर्वोत्तम झाली.

*नेतृत्व हे अधिकार पदापेक्षा खूप वर असते.*

*समस्या ओळखण्यासाठी चिकित्सक विचारांची (critical thinking) आवश्यकता असते तर समस्या सोडवण्यासाठी सर्जनशील (creative thinking) विचारांची!*: ......फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी
....  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी
....... गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी
...... वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी
...... पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी
..... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी
....... गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी
...... पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी
...... पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी
...... पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी

.
   मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नी कडून वसूल केले.
.
म. गांधीजींच्या जयंतीच्या गदारोळात त्यांचा हा कर्मयोगी शिष्य नेहमी झाकोळला जातो.
असे साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी,
त्यांना अनंत दंडवत....
[10/3, 5:34 PM] Vishnu Dhebe: काश्मिर व्हॅलीत मोबाईल नेटवर्क/इंटरनेट बंद आहे, सर्वांसाठी भारतीय सैनिकांसाठी सुद्धा,
      तर एक खरी हकिकत
एक आर्मीतील जवान,
      त्याने रात्री ड्युटी संपल्या नंतर काश्मिरमधील ख्वाजाबाग बारामुल्ला एरीयात एटीएम मध्ये जावुन शंभर रूपये काढले व्यवस्थित वॅलेट मध्ये ठेवले व बाहेर पडला.
     दुसर्या दिवशी सेम असचं केल. पैसे काढले व्यवस्थित वॅलेट मध्ये ठेवले व बाहेर पडला.
  अस काही दिवस चालल होत. एटीएम च्या बाहेरचा सिक्युरीटी गार्ड त्याला रोज पहायचा.
       त्याचा रोजची अशी कृती पाहून त्याला आधी किव आली, नंतर त्याला त्याची शंका यायला लागली.
   नंतर नंतर त्याला त्याचा भिती वाटु लागली. त्याला वाटु लागल हा काहीतरी उलटसुलट काम तर करत नाही ना?
     माणूस तर आर्मीचा दिसतोय, म्हणून तो काही विचारायला बिचकत होता. तसही तिथे रात्रीची वर्दळ खूप कमी असते. पण त्याला काही चैन पडेना.
    एक दिवस काही स्थानिक लोक जवळपास होती म्हणून त्याने धीर केला काही झालं तर ती माणसं आपल्याला साठी धावुन येतील. असा विचार करून त्याने त्या आर्मीच्या माणसाला थांबवल.
    नी हलकेच पण अदबीन(आदरानं) विचारलं. "साहेब, तुम्ही रोज येता फक्त शंभर रूपये काढता, रोज इतक्या दुरून यायच लाईन लावायची नी फक्त शंभर रुपये काढायचं इतका त्रास करण्यापेक्षा एकदाच पाहिजे तेव्हडे पैसे का नाही काढत."
     ते ऐकून त्या आर्मीच्या सैनिकाने डोक्यावर हात फिरवला, आपली वर्दी ठिकठाक केली. त्या  वे‍ेळेस तो खूप दमलेला दिसत होता. पण खंबीर दिसत होता.
त्याने शांतपणे उत्तर दिलं.
      "मी जेव्हा पैसे काढतो, तेव्हा त्या काढलेल्या पैशाचा मेसेज येतो तो माझ्या पत्नीच्या फोनवर जातो कारण माझ अकाऊंट तिच्या फोनला लिंक आहे, आणि तिला समजतं, मी अजून जीवित आहे."
     अस हे खडतर बेभरवशी आयुष्य आपल्या वीर जवान आणि त्यांच्या पत्नींच व कुटुंबीयांच.
   कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏




काल एक धक्का बसला. अजुन सावरलो नाही.
एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा ( साधारण वय वर्ष  आठ) एका कोपर्‍यात बसून ईतरांचा पकडापकडीचा खेळ बघत होता.
कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता.पण खेळत नव्हता.
मी त्याला विचारले...

" बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?"

त्याने खेळावरील नजर न हटवता मला ऊत्तर दिले .

" आय नको म्हनत्या ...."

" आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील !"

त्याने ऊत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला.
मलाच त्याला चिडवण्याची खुमखूमी गप्प बसू देईना....

" मला माहीती आहे, आई तूला खेळायला का नको म्हणते !!! अजिबात अभ्यास करत नसशील !!!"

माझा टोमणा त्याला बरोबर  बसला असावा. खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहर्‍यावरून गायब झाला. त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली , जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले...

" आई म्हनत्या...खेळू नको....खेळून भुक लागल....मग खायला मागशील "

त्याच्या डोळ्यात किंचीत पाणी आले होते. तडातडा ऊठून तो कुठेतरी निघून गेला.

मी अजूनही बेचैन आहे. आणी गेल्या वर्षभरात भुक लागावी, अन्न पचावे म्हणून औषधांवर किती खर्च केला याचा हिशोब करत बसलो
*🙏अन्न म्हणुन ताटात वाया घालवु नये🙏*




           *हृदयस्पर्शी*
: चोरी

"सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा."
"नाही रे, नीट दिसत नाही आजकाल आणि स्मृतीही दगा देऊ लागली आहे. बरं ते जाऊ दे, तू बोल, काय करतोस आजकाल ?"
"सर, मी पण तुमच्या सारखाच शिक्षक झालोय."
"अरे वा, हो का? पण काय रे, शिक्षकांचे पगार एवढे कमी, तुला का रे वाटलं शिक्षक व्हावंसं ?"
" सर, तुम्हाला मी आठवेन बघा. मी सातवीत असतांना आपल्या वर्गात एक घटना घडली होती आणि मला तुम्ही त्यातून वाचवलं होतं. खरं तर तेव्हाच मी ठरवलं होतं कि तुमच्या सारखंच शिक्षक व्हायचं.
"असं काय बरं झालं होतं तेंव्हा वर्गात?"
"सर, आपल्या वर्गात एक अक्षय नावाचा श्रीमंत मुलगा होता. एक दिवस तो हाताचं घड्याळ लावून आला. आमच्या कुणाकडेच तेव्हा घड्याळ नव्हतं. ते घड्याळ चोरायची माझी इच्छा झाली. आणि खेळाच्या तासाला जेव्हा मी पाहिलं कि त्याने घड्याळ कंपास पेटीत काढून ठेवलंय, मी योग्य संधी साधून ते माझ्या खिशात घातलं. पुढचा तास तुमचा होता. तुम्ही वर्गात येताच अक्षयने तुमच्या जवळ घड्याळ चोरीची तक्रार केली. तुम्ही आधी वर्गाचं दार आतून लावून घेतलंत. म्हणालात," ज्याने कोणी घड्याळ घेतले असेल, त्याने ते परत करावे, मी शिक्षा करणार नाही."
माझी हिम्मत होईना कारण मी ते परत केले असते तर आयुष्यभर माझी सर्वांनी "चोर" म्हणून हेटाळणी केली असती.
पुढे तुम्ही म्हणालात," उभे रहा सारे एका लाइनीत आणि बंद करा आपले डोळे.  मी सर्वांचे खिसे तपासणार आहे. मात्र सर्वांचे खिसे तपासणे होईपर्यन्त कुणीही डोळे उघडायचे नाहीत."
तुम्ही एक एक करत सर्वांचे खिसे तपासत माझ्या जवळ आलात, माझी छाती धडधडत होती. तुम्ही माझ्या खिशातून ते घड्याळ काढलंत पण तरीही उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खिसे तपासलेत आणि ते झाल्यावर आम्हाला डोळे उघडायला सांगितलं. तुम्ही अक्षयला ते घड्याळ देऊन म्हणालात," बाळा,पुन्हा घड्याळ घालून वर्गात येऊ नकोस आणि ज्याने कोणी ते घेतलं होतं, त्यानं असं गैरकृत्य पुन्हा करायचं नाही " आणि नेहमी प्रमाणे तुम्ही शिकवायला सुरुवात केलीत.
तेव्हाच काय पण पुढे मी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळा सोडली तरी तुम्ही माझ्या चोरीची ना कधी वाच्यता केली, ना कधी मला ते दर्शवलंत. सर, आजही माझे डोळे पाणावले ते आठवून. सर, मी तेव्हाच ठरवलं होतं की मी पण तुमच्याच सारखा शिक्षक होणार आणि मी झालोही. "
"अरे, हो, हो, मला आठवते आहे ती घटना. पण मला या घटकेपर्यंत माहीत नव्हतं कि ते घड्याळ मी तुझ्या खिशातून काढलं होतं, कारण....
कारण तुमचे खिसे तपासून होईपर्यंत मी पण आपले डोळे बंद ठेवले  होते."                                                 

                                                         🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...