सुंदर सुविचार

1. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.                                                                                                                                4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.                                                                                                                                                                         6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.                                                                                                                        7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

13. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

14. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”                                                              16. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

17. “जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”

18. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

19. भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.. 
                                                                                                                                                                                 20. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

21. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

22. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.                     
                                                                                         23. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

24. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

25. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.         
                                                                                                                                                                                26. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
                   
27. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.     
                                                                                        28. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

29. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

30. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

31. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

32. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

33. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

34. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.35. अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

36. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

37. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.                                                                                                                  38. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

39. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

40. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
41  कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

42. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …

43. न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

44. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

45. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.           
                                                                                           46. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

47. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

48. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.

49. विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.                                                                                        50. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

51. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

52. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.   53. प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

54. जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

55. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

56. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

57. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!

58. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

59. माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

60. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

No comments:

Post a Comment

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...