Saturday 8 April 2023

*विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यांच्यावतीने 'समावेशीत शिक्षण' अंतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन आज करण्यात आले होते.* _पांचगणी येथील भव्य-दिव्य व उत्तम निसर्ग सानिध्य लाभलेल्या *ON WHEELS-AMUSEMENT PARK* मध्ये या नाविन्यपूर्ण क्षेत्रभेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...FERRIES WHEEL, RAINBOW, OCTOPUS, SUN AND MOON, STRIKING CAR, BRAKE DANCE, TSUNAMI, MONOTRAIN, BABY TRAIN, HORROR HOUSE, ZYCLONE, ARCHERY, BUNGY JUMPING या सारख्या वेगवेगळी 12 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या amusement पार्क मध्ये आहेत. प्रत्येक राईडचा थरार विद्यार्थ्यांनी अनुभवला..._ *गावातील यात्रेमध्ये अगदी लहान व थोडी खेळणी यांचा अनुभव विद्यार्थ्यांना होता परंतु एवढ्या प्रचंड मोठ्या आकाराची खेळणी पाहिल्यानंतर विद्यार्थी हरखून गेले... सुरुवातीला काही प्रमाणात बुजलेले विद्यार्थी एका एका राईडचा थरार अनुभवताना खूप आनंदी झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील ओसांडणारा आनंद त्याची साक्ष देत होता...* _दुपारच्या सत्रात तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्मानीय आनंद पळसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी व पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधला..._ *यावेळी सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. व्हेज पुलाव, कोशिंबीर, जिलेबी यावर विद्यार्थ्यांना मनसोक्त ताव मारल्यानंतर पुन्हा नवीन जोशात समुद्री माशांचे विविध प्रकार पाहिले व त्यांची माहिती घेतली.. हॉरर हाऊसचा थरार पाहताना विद्यार्थ्यांनी वेगळीच मजा अनुभवली...* _खरोखरच विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा सदैव स्मरणात राहणारा आनंदाचा दिवस कधी संपला हे विद्यार्थ्यांना समजलेच नाही. काही प्रमाणात दुर्लक्षित असलेली ही बालके आज या निमित्ताने खरोखर आनंदी दिसत होती.._ *या विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी या सुंदर उपक्रमाचे आयोजन करणारे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे साहेब तसेच समावेशीत शिक्षण उपक्रमातील साधनव्यक्ती सचिन चव्हाण सर, श्रीनिधी जोशी मॅडम, कुलदीप अहिवळे सर, खामकर सर यांच्या नेटक्या नियोजनात आजचा क्षेत्रभेटीचा उपक्रम संस्मरणीय ठरला...* ✒️शब्दांकन:- *श्री.विष्णू ढेबे,चिखली..*

* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...