Pages
- Home
- नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम
- शैक्षणिक विचार
- सुंदर सुविचार
- वाचनीय लेख
- सामाजिक सहभाग
- माझ्या कविता
- माझी विडीओ निर्मिती
- माध्यमातील दखल
- शासन निर्णय
- शालेय पाठ्यपुस्तके
- अप्रगत मुलांसाठी अभ्यास
- आजचे वय काढा .
- शैक्षणिक चित्रपट यादी
- MY PHOTOGRAPHY
- ACHIEVEMENTS
- MY APPS
- READ TO ME SOFTWARE
- LEAP FOR WORD
- शिष्यवृत्ती तयारी
सुस्वागतम्
सुस्वागतम् ,सुस्वागतम, सुस्वागतम्आपले ब्लॉगवर सहर्ष स्वागत करण्यात येत आहे.विविध शैक्षणिक ,सामाजिक , तंत्रज्ञान विषयक माहितीसाठी नेहमी ब्लॉगला भेट द्या .
Friday, 15 May 2020
Wednesday, 13 May 2020
Tuesday, 12 May 2020
Monday, 4 May 2020
*मनामनाच्या मनामनातील माणुसकीच्या भिंती!!!!!!!!*
*खरं तर व्हाट्सएप व फेसबुकची भिंत (whatsapp , facebook Wall) या टाळा बंदीच्या काळामध्ये खूप काही शिकवत आहे. अगदी एक प्रकारची गुरुची भूमिका निभावताना दिसतेय. अगदी अन्न, पाणी, हवा यासारखी जीवनावश्यक गोष्ट बनली आहे.पण होतय कसं, कधी संदेशाची एवढी जत्रा भरलेली असते की काय बोलायची सोयच राहत नाही. जत्रेत एखादे लहान मूल हरवून जाते, व घाबरून जातं.. तशीच या मोहजालात मनाची अवस्था होऊन जाते. काही दिवसांपूर्वी या भिंतीमुळे "माणुसकीची भिंत" जी कोणत्या तरी दूर देशी उभी राहिली होती, तिच्यापासून बोध घेत खेडोपाडी, लहान मोठया शहरांमध्ये माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या होत्या. जुने वापरलेले कपडे, जुन्या वस्तू या भिंतींनी गरजू लोकांना पुरवल्या.काही का होईना पण या निर्जीव भिंतींना माणुसकीचा ओलावा स्पर्श करून गेला होता. या भिंतीमुळे माणसालाही आपल्याकडे काय जास्त आहे हे कळले व जास्तीचे दुसऱ्यांना देण्याची जाणीव निर्माण झाली त्यातून गरीब व गरजवंत लोकांना लाखमोलाची मदत मिळाली. खरच अशा* *माणुसकीच्या भिंती व्हाट्सएप व फेसबुक च्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी उभ्या करण्याचा उत्तम प्रयत्न बऱ्याच ठिकाणी झाला.*
*मागे काही महिन्यांपूर्वी जावली तालुक्यामध्ये या भिंतीचा खूप चांगला सामाजिक वापर होताना आपण सगळ्यांनी पाहिल. एक शाळकरी मुलगा आजारी पडतो, दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा अवाढव्य खर्च. त्या गरीब कुटुंबाला न परवडणारा.मग त्याच शाळेतील शिक्षक "एकाचे लाख नकोत पण लाखोंचा एक एक रुपया हवा"याप्रमाणे याच भिंतीवर भावनिक संदेश टाकतात. आणि लाखों कडून थोडी थोडी मदत जमा होते ,समाजातील सर्वच घटकातून मदतीचा ओघ सुरु होतो व त्या कोवळ्या शाळकरी मुलाचा जीव वाचतो. किती मोठी ताकत आहे या भिंतीमध्ये..... कारण मदत देताना अहं भाव नाही की मदत स्वीकारनाऱ्याचा ओशाळलेला चेहरा नाही. कारण या हाताचे दुसऱ्या हाताला कळण्याचा मार्गच नाही. कारण सर्वांनी दिलेल्या अकाउंटला ऑनलाइन पैसे भरले होते.अशाप्रकारे रक्ताच्या नात्यांबरोबरच माणुसकीची नाती या निर्जीव भिंतीमधून तयार होण्यास मोठी मदतच होते. अशा कितीतरी सामाजिक बांधीलकीतुन विविध गोष्टी होताना आपण सारे पाहत असतो, आपापल्या परीने आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आपण करत असतो. यात या भिंतीचे अस्तित्व कामी येत आहे हे वेगळे सांगायला नको.*
*साधारण दहा पंधरा वर्षांपूर्वी मधल्या काळात माणसाला व्यक्त होण्यासाठी काहीच माध्यम उरले नव्हते ,बरेचजण आपल्या आपल्यातच घुटमळत होते, एक तर चार भिंतीच्या आतमध्ये किंवा अगदीच वेळ मिळाला तर गल्लीमध्ये. तशी माणस या ठिकाणी दिल्ली पर्यंतच्या बाता करायची पण ऐकणाऱ्यांची मर्यादा असायची. पण या भिंतीमुळे किती छान झाले आहे बघा.... गल्ली राहुद्या, दिल्ली जाऊद्या त्याने आख्खी जागतिक बाजारपेठच कवेत घेतलेयना.कोणत्याही राष्ट्रीय, जागतिक धोरणांवर माणसाला मुक्त आपले विचार मांडता येत आहेत. पण काहीवेळा अतिरेक होतानाही आपण पाहतोय...सकाळ संध्याकाळ, सुट्टीच्या दिवशी, झोप येत नसेल तर, कधी कधी रात्री अपरात्री जाग आल्यानंतर,अगदी कामाच्या ठिकाणी तंबाखूची तलफ आल्यागत त्याची अवस्था झाली आहे. थोडा जरी वेळ मिळाला तरी या भिंती वाचण्यासाठी त्याचे मन अधीर होते. अगदी समोर कामाचा फार मोठा व्याप असेल तरी त्याला दूर सारता येत नाही. एकवेळ जेवण पाणी वेळेवर नाही मिळाले तरी चालेल पण आपल्या पोस्टला लाईक किती मिळाल्या हे पाहण्यातच तो मश्गुल असतो. समजा त्यावेळी नेटवर्क मुळे काही समस्या निर्माण झालीच तर तो अगदी वेडापिसा होतो. व त्या भिंतींच्या दर्शनासाठी त्याची नेटवर्क शोधण्यासाठी धडपड सुरू होते, व सापडल्यानंतर त्याचा जीव भांड्यात पडतो. कधी कधी येतो चार्जिंगचा प्रॉब्लेम... त्यावरही आता पावर बँकचा इलाज शोधून काढलाय ना.... हे झाले मोठ्यांचे, मग लहान मंडळी काय मागे राहतील.त्यांनीही त्यांच्या भिंती सजवायला नाटवायला अगदी आठव्या नवव्या वर्षापासून सुरुवात केली तर कसले आश्चर्य?? मग सुरुवात होते तोंड वेडेवाकडे करून स्वतःला वेगळे सिद्ध करण्याची स्पर्धा???घरातील मोठी मंडळीही अगदी चारचौघात ........"मला यातले काही कळत नाही पण माझ्या मुलाला सर्व काही माहीत आहे......अगदी बरोबर शोधून काढतय "अस म्हणून प्रोत्साहनच देत असतात.पहिले मुलांचे खेळही सिझनेबल असायचे तसं आता मोबाईलवरही सुरू झालय. एक संपला की दुसरा .पब्जीन अगदी सब्जी झालेय मुलांच्या डोक्याची,,, पब्जी झालं की हॅलो, हॅलो झाल की टिक टॉक आता यापुढील कंपन्यांनी तयार केले असेलच. खूप तरलता ठेवली आहे ती ही अगदी विचारपूर्वक . लहान मुलेही मग भिंतींवर आपला गेमचा स्कोर ठेवतात स्टेटसला .म्हणजे तोही स्टेटस ठेवणे आता स्टेटसचा भाग झालाय असच मलातरी वाटतय..... दुसरे असे की या भिंती वाचता वाचता माणसाचा वाचनाचा दृष्टिक्षेपही खूप वाढलाय एवढ मात्र नक्की. पूर्वी समाजामध्ये ठराविक मोजकेच लोक वाचन करत होते त्यातील खूप कमी वाचनालयात मासिक वर्गणीदार होऊन वाचणारे.. पण सध्याच्या घडीला या भिंतीच्या माध्यमातून वाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे.मनाला प्रेरणा देणारे, कुठेतरी मनाला भावणारे, तर काही वेळा मनाला अधिक संवेदनशील बनवणारे सुंदर लेख वाचायला मिळतात. एखाद भलंमोठं पुस्तक वाचन करून त्यातील वेचक वेधक, काहीतरी चिंतन करायला लावणार अगदी सारांश लेखनासारखं वाचण्याची संधी आपल्याला उपलब्ध होत आहे. काहीजण त्यातून आपली स्वतःची सुंदर शब्दफुलें गुंफत असतात तर काही जण काव्यफुलें ओंजळीने उधळत असतात. कधी कधी समाज प्रबोधन करणार लिखाण तर कधीकधी कस जगायचं कस वागायचं याचा विचार करायला लावणारे लेख आपल्याला या भिंतींवर कोरलेले पाहायला मिळतात.*
*कधी कधी गर्दी होते भिंतीवर ..........पण आपणच शोध घ्यायचा असतो त्यातील चांगुलपणाचा ......शोध घ्यायचा असतो दर्दी बनून नाविन्याचा..... आपणच राजहंस व्हायचे चांगले काय आणि वाईट काय शोधण्यासाठी..... . नाहीतर काही माथेफिरू असतात टपलेले समाजमन भडकवयला.......... ते ही फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी... कधी कधी तर खूप वाईट वाटते, जी माणसे व्हाट्सएप किंवा फेसबुकवर आपल्या शब्दफुग्यांनी भिंती नटवतात,त्यामध्ये वेगवेगळे शाब्दिक रंग भरतात. पण प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र त्यांचे बरेचदा रंग उडलेलेच जाणवतात. शब्दांमधले त्यांचे सामर्थ्य फिके पडल्याचं जाणवत बरोबर ना??? त्यांच्याशी नक्की कसं वागायचं हे त्यावेळी समोरच्याला वळत नाही. "दुरून डोंगर साजरे "म्हणायची वेळ येते आपल्यावर.... कधी कधी वाढदिनी, यश संपादन केल्यावर या सामाजिक भिंतीवर शुभेच्छांची गर्दी होते पण ,पण प्रत्यक्ष त्याच दिवशी भेटल्यावर शुभेच्छा देण्यासाठी हात समोर येत नाही.... किती दुर्दैव......?? या शुभेच्छा या भिंतीवर इतक्या गर्दी करतात त्यांचा एवढा अतिरेक होताना दिसतो की जसे अनेक रंग आल्यावर जसा बेरंग होऊन जातो तशीच या भिंतींची अवस्था होऊन जातो. तुफान पावसाने महापूर यावा अशी अवस्था होऊन जाते .......अती पावसाच्या पाण्याने चिखलच होतो ,मग निवळायलाही खूप वेळ लागतो......तसच त्यां भिंतींना पुन्हा शुभ्र करण्यासाठी क्लिअर ऑल शिवाय पर्याय राहत नाही आपल्याकडे. मग अशावेळी नाजूक कळी चुकून आपल्याकडून खुडली जाते ,तसे काही चांगलेही क्लिअर ऑल होऊन जाते अशावेळी घाईत........ मग आपलीच मनात चिडचिड होऊन जाते.आणखी असा प्रश्न पडतो की वाढदिवसालाही तीच फुल आणि श्रद्धांजली वाहतानाही तीच फुल.... आणि योगायोगाने अस काही एकाच दिवशी घडल की मनाचा गोंधळच उडतो. नक्की शुभेच्छा दयाव्या का श्रद्धांजली दयावी......पण याच भिंतींमुळे अनेक दिवस झालेली ताटातूट पुन्हा एकदा फुलते..........., मित्रत्वाचीही पुन्हा एकदा झुलते......... त्यावेळी मात्र आपल्या साऱ्यांचे मनही खुलते........ आणि पुन्हा एकदा मुहूर्त साधला जातो गेट टुगेदरचा .......आणि हे शक्य होतय केवळ आणि केवळ या अलौकिक भिंतीमुळच होय ना......? अनोखी भिंत म्हणावी लागेल ना हिला....??सगळ्यांच्या भावना अलगद स्वीकारताना तिचा जीव मात्र घुटमळत नसेल ना..???जस आपलं होत कधीतरी तसं......पाहिजे त्यावेळी पाहिजे असणारा मेसेज सापडत नाही तेंव्हा.... जशा आपल्या घराच्या भिंती असतात चार इंची, सहा इंची, नऊ इंची तशा हिच्याही भिंती विविध समूहाच्या माध्यमातून बनलेल्या असतात काहींच्या आठ जीबी, काहींच्या सोळा जीबी, काहींच्या चौसष्ठ जीबी...... सिमेंटप्रमाणे हे समूह प्रमुख समाजातील विविध घटकांना सांधण्याचे काम करत असतात. भिंतींचे प्लास्टर जेवढे आकर्षक तेवढ्या इमारती आकर्षक ....त्याप्रमाणे तुमचे समूह जेवढे चांगले तेवढया तुमच्या याही भिंती आकर्षक... नाहीतर मग सारखी दुरुस्ती आलीच कॉपी पेस्ट डिलीट करण्याची....त्यासाठी जेवढे तुमचे समूह किंवा गट उत्तम तेवढे तुमचे आचार विचार उत्तम.... असे म्हणण्याची वेळ आली आहे. भिंतीतर आता आपोआप बांधल्या जात आहेत, आता गरज आहे त्यावर रुफिंग करण्याची ....समजलात ना....?म्हणजे सुंदर सुविचार केवळ वाचायचे नसतात तर ते प्रत्यक्ष आचरणात ही आणायचे असतात. उत्तम विचार आपल्या शरीरात भिनवायचे असतात, आणि आपणच आपल्याला नटवून पहायच असत समाजमाध्यमरूपी आरशात........... संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंती चालवल्या होत्या त्या काळात....त्यांच्या अलौकिक सामर्थ्याने.... ... आपण सारे ही आपल्या भिंती चालवतोय तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने... आजच्या धकाधकीच्या जीवनात आपणही भिंती चालवताना काळजी घेतली पाहिजे....मानामनातल्या अविश्वासाच्या..... द्वेषाच्या.... स्वार्थाच्या भिंती दूर सारून .....या भिंती एवढ्या पारदर्शक झाल्या पाहिजेत की या भिंतीमधूनही पलीकडचे सहज दिसेल.. व्हाट्सएप ,फेसबुकच्या भिंती बरोबरच विविध भिंती अस्तित्वात आहेत, या ठिकाणी कंटाळून काहीजण ट्वीटर , लिंक इन यांसारख्या ठिकाणीही घरोबा करत आहेत......साऱ्यांचा एकमेकांनी शोध नक्की घेतला पाहिजे.... अधिक सक्षम होण्यासाठी ........नाविन्याचा ध्यास धरला पाहिजे.... समाजाने समाजाच्या विधायक कामासाठी समाज माध्यमांचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे.... समाज माध्यमाच्या भिंतींवर तिचे गुणदोष मांडताना अवघडल्या सारखं वाटतंय... पण ती त्यांच्यासाठीच आहेत ना........ ????.मुक्त व्यक्त होण्यासाठी.....????*
*✒️✒️✒️✒️✒️©विष्णू ढेबे. महाबळेश्वर*
📞 -7588686065
Tuesday, 21 April 2020
📕📗📘📙📒📔📗📕
*पुस्तक परिचय*
*पुस्तकाचे नाव- चीपर बाय दी डझन*
लेखक- फ्रँक गिलब्रेथ(ज्युनियर) व अर्ने स्टाईन कॅरे
अनुवाद - मंगला निगुडकर
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या- १४४
किंमत- १०० रुपये
📓📔📒📙📘📗📕📒
*चीपर बाय दी डझन हे पुस्तक फ्रॅंक गिलब्रेथ व अर्ने स्टाईन या एका मुलाने व मुलीने मिळून लिहिलेले आपल्या वडिलांचे चरित्रवजा पुस्तक असले तरी मनोवेधक व मनोरंजक आहे ,जे पूर्ण केल्याशिवाय आपण खाली ठेवत नाही. आपल्या वडिलांच्या लहानपणीच्या आठवणी मुलांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत .फ्रँक गिलबर्ट हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनीयर असतात .कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी पूर्ण करायची यावर ते संशोधन करत असतात .व त्यासाठी ते आपल्या स्वतःच्या मुलांवरही घरी प्रयोग करून पाहत असतात .खास वेगळा खर्च न करता व खास वेगळा वेळ न देता व्यवहारातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या मुलांना या पद्धतीनेच शिकवल्या होत्या. त्यांच्या या शिक्षण पद्धतीचे अमेरिकेतही त्यावेळेला कौतुक झाले होते .सर्व कारखान्याची उत्पादन क्षमता आपण पंचवीस टक्के वाढवून दाखवू असे ते आत्मविश्वासाने सांगत आणि करूनही दाखवत .जगभरातून कारखानदार त्यांना त्यांच्या या कौशल्यामुळे मार्गदर्शन करण्यासाठी बोलावत असत. कामगारांच्या काम करत असतानाच्या अनावश्यक हालचाली टाळून प्रत्येक काम झटपट कसे करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ते निरीक्षण करून चलतचित्रे काढत आणि अनावश्यक हालचाली शोधत त्या अनावश्यक हालचाली टाळल्या की काम आपोआपच वेगात होत हाच त्यांचा सिद्धांत असतो.*
*पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्यांना स्वतःची बारा मुले होती आणि या सर्वांना वाढवण्यासाठी त्यांनी घरांमध्ये लष्करी शिस्त लावली होती .ते ज्याप्रमाणे कारखान्यांमध्ये कमी वेळेत जास्त काम झाले पाहिजे तसेच घरामध्ये सुद्धा कमी वेळेत जो मुलगा पटकन सर्व कामे करेल त्याला बक्षीस ते देत असत. प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ असलेच पाहिजे व काम करत असताना आपले बारीक लक्ष अगदी सेकंद काट्यावर ही असावे असा त्यांचा असा दंडक होता.घरामध्ये वेळेचा आणि हालचालींचा अपव्यय करणे म्हणजे गुन्हा समजण्यात येई. एवढ्या मुलांना सांभाळ तुम्हाला कसे शक्य होते ?असे जर कोणी त्यांना विचारले तर ते उपहासाने म्हणायचे की माझी बारा मुले असल्यामुळे मी कोणत्याही वस्तू डझनाने घेतो त्यामुळे आम्हाला स्वस्त मिळतात ,असे त्यांचे विनोदी उत्तर असायचे*
*दर आठवड्याला ते कुटुंब सभेचे नियोजन करून आठवड्याची कामे वाटून देत असत त्यातूनच त्यांनी मुलांना त्यांनी जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण दिले होते या जर्मन व फ्रेंच भाषेतील ग्रामोफोनच्या तबकड्या मुले आंघोळीला जात असताना त्यावेळी बाथरूममध्ये वाजवल्या जात असत, केवळ ऐकून ऐकून त्या मुलांनी जर्मन व फ्रेंच भाषा त्यामुळे अवगत केल्या होत्या .टंकलेखनाची ही त्यांनी स्वतःची अशी एक पद्धत विकसित केली होती आणि त्याचा वापर त्यांनी आपल्या मुलांवर करुन कमी वेळेमध्ये टंकलेखन कसे करावे हे अमेरिकेत पटवून दिले होते. जास्त अभ्यास करून एखादा वर्ग गाळल्यास त्या मुलांना ते सायकलचे प्रलोभन दाखवत असत त्यामुळे सर्वजण बहीण आणि भाऊ जास्तीत जास्त अभ्यास करून एखादा वर्ग कसा गाळला जाईल यासाठी प्रयत्न करत असत .बऱ्याच अवघड गोष्टी त्यांनी आपल्या मुलांना अगदी कमी वेळेत घरीच शिकवल्या होत्या.पहिल्या महायुद्धात त्यांची कमीत कमी वेळात शस्त्र जोडणे सुट्टी करणे या कामी अमेरिकन लष्कराने मदत घेतली होती .वैद्यकशास्त्रात ही एखादे ऑपरेशन निम्मा वेळ वाचवून कसे करता येईल याचे संशोधन त्यांनी मांडले होते. त्यांना कुणीतरी एकदा व्याख्यानांमध्ये प्रश्न विचारलं होता- प्रत्येक गोष्टीत वेळ वाचवून या वाचलेल्या वेळात करायचं तरी काय ?? त्या वेळात आणखी काम करायचं ,शिक्षण घ्यायचं, कलानिर्मिती करायची, मौज करायची वेगळे छंद जोपासायचे, आयुष्य भरभरून जगायचं अस समर्पक उत्तर त्यांनी दिले होते.*
*पुढे त्यांची बारा ही मुले मोठी होऊन अमेरिकेत वेगवेगळ्या मोठ्या पदांवर काम करत आहेत ,त्याच बरोबर त्यांच्या या पुस्तकांवर सिनेमा सुद्धा काढला गेला. सिनेमाही खूप गाजला होता.मुलांचे मानसशास्त्र कसे असते आणि मुलांचा योग्य विकास कसा साधावा यासाठी प्रत्येक पालकांनी त्याचबरोबर शिक्षकांनी वाचावे असे हे सुंदर पुस्तक आहे . आपल्या मुलांना वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे सुंदर धडे या पुस्तकाच्या पानापानात शिकायला मिळतात.चरित्र म्हटल्यानंतर कितीतरी वेळा जीवनात संघर्ष मांडला जातो परंतु या पुस्तकामध्ये जरी संघर्ष असला तरी सुद्धा तो अतिशय विनोद बुद्धीने मांडून त्याच्यावर मात करून गरीब परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना शिकवण्याची धडपड या पुस्तकात प्रत्येक ठिकाणी व्यतीत होत असते.*
✒️✒️✒️ ✒️✒️✒️
*© विष्णू ढेबे- महाबळेश्वर*
📞📞-7588686065
www.vishnudhebe.blogspot.com

Tuesday, 14 April 2020
🌦️🌧️⛈️ *कालच्या पावसाच्या निमित्ताने* 🌨️⛈️🌧️ -------
पावसाळ्यातील अति पावसाने ,त्याच्या नको असलेल्या रिपरिपिने माणूस नक्कीच कंटाळतो ,पण तोच पाऊस जर उन्हाने काहिली होत असताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरसला तर माणूस नक्कीच सुखावतो .माणसाच्या जीवनप्रवासातही काही असच आहे .........ह्या धावत्या जगामध्ये ,आशानिराशेच्या फेर्यांमध्ये उन्हाळ्यातील पावसा सारखे काही चार थेंब शिंपडले तर तो खूपच सुखावतो ,नाहीतर पावसाळ्यातील रिपरिपी सारखेच त्याला आयुष्य भासते .पावसाळ्यातला मान्सून सारीकडेच आपल्या मुक्तहस्तानी उधळण करत करत ,सार्यांना सुखावत पुढे पुढे प्रवास करत असतो .उन्हाळ्यात होणारे त्याचे शिडकावे मात्र काहींच्याच नशिबात .त्यातही एखादे पिक पिक जर कापणीला आलेले असेल तर बळीराजाच्या डोळ्यातून वाहणारे दुखाश्रू सार्यांच्या काळजाचा ठोका चुकवतात .तसा तो बाल्कनीत उभा राहून पाहायला लहान थोरांना आवडतो ,मात्र विजांच्या कडकडाटात गुरे चारणाऱ्या गुराख्याला ,परतीच्या वाटेवर चालत असताना मध्येच गाठून चिंब झालेल्या वाटसरुना त्याचे रौद्र रूप कुठपर्यंत धड्कतंय कि फिरतोय येथूनच माघारी असे अनेक प्रश्न मनात घोंघावतात ?सारेच प्रश्न अनाकलनीय ?.तसे अंदाज वर्तवले जातात त्याच्याबाबत वर्तमानपत्रातील कधीही न खरे ठरणाऱ्या राशीभविष्यासारखे .......तो असतोच साऱ्यांच्या अंदाजाच्या पलीकडचा . कोणाला आवडतो त्याच्या पहिल्या मातीतला सुगंध....... ,तर तो आवडतो पानामधून निथळताना....... तर काहींना त्याच्या जलधारा सांडतात जेंव्हा उंचावरून........, तर काहींना त्याच्या मुळेच हिरव्यागार झालेल्या धरणी मातेच्या रुपात.......,तर काहीना आवडतो जेंव्हा तो दाखवतो सुवर्णरुपी इंद्रधानुष्यातून आपले ओजस्वी रूप ........... पण जेंव्हा तो खूप दिवसातून धरणीमातेची गळाभेट घेत असेल तेंव्हा आईच्या कुशीत मायेने काही क्षण विसावण्यासारखा दुसरा आनंद त्याला वाटत नसेल ..........कारण त्याची सुरवातच या मातेच्या अंगाखांद्यावर झालेली असते .तिच्या अंगाखांद्यावर खेळता खेळता तिला अलगद दूर सारून उंच गगनात जाण्याची त्याची महत्त्वकांक्षा त्याला कशी गप्प बसू देईल? खेळता खेळता सारे मोहपाश दूर झुगारून मातेला दूर सारून कधी तो उंच भरारी घेईल काही सांगता येत नाही .माणसाचेही काही तसेच आहे ना .......? मोठ्या महत्वकांक्षा मनाशी बाळगून ,सारे काही झुगारून तो हि जातो की खूप दूरच्या देशी . पण शेवटी ओढ असतेचना आपल्या माणसांची ......पावसालाही उंचावरून आपल्या मातेचे रूप पाहताना आठवण नक्की होत असेलचकी.त्याला गर्व होत असेलच मोठी उंची गाठल्याचा आणि भूमातेलाही अभिमान वाटत असेल त्या उंचीचा .पण हे उंचीचे अंतर फार काळ कुठे टिकते ? दोघानाही ओढ असतेच ना खूप दिवसांनी परत......... भेटण्याची .अशावेळी त्याच्या प्रवासात अडथळे येतातच त्याच्याच उंचीच्या गिरीशिखरांचे जे करत असतात त्याच वेळी ...........आकाशाशी स्पर्धा .,आणि तो पुन्हा माघार घेवून आतुर होतो असेल पुन्हा यथेच्छ खेळण्यासाठी आपल्या मातीत .......आपणही होत असतो आतुर सारे त्याच्या भेटीला बरोबर् ना???? कधी वेळेत तर कधी वाट पाहत ठेवणारी भेट असते ती फार पूर्वापार चालू असलेली ही विलोभनीय गळाभेट.....कधी होते अगदी वेळेत तर कधी कधी वाट पाहायला लावणारी.....पण ती वेळेत होत नाही यास कारणीभूत कोण ?त्याच्या पूर्वापार चाललेल्या या जीवनप्रवासात आपण सारेच काटे पसरत असतो .आपल्यातील काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार असतो . स्वतःचा विकास म्हणजे गर्द हिरवाई छाटून तेथे स्वतःच्या अहंकाराचे पांढरेशुभ्र सिमेंट काँक्रीटचे कृत्रिम जंगल वसवण्यात तो अगदी गुरफटलेला असतो.... काहीजण तर तो विकास नावाचा अजब गजब ,साऱ्यांना मोहित करणारा पण मृगजळाप्रमाणे कधीही न सापडणारा मोह राक्षस शोधण्यात आपल्याला कृतकृत मानत असतात.पण ही भूमाता किती सोसणार हे सारे काही......? आपले किती स्वार्थी हट्ट किती दिवस ती पुरवणार..... ?ज्याप्रमाणे कुर्हाडीचा दांडा गोतास काळअसे म्हणले जाते तसेच काहीसे चालू आहेना सध्या या पृथ्वीतलावर....? . ज्या मानवजातीने धारणीमतेच्या अंगाखांद्यावर चांगले दिवस काढले त्यांची पुढची पिढी मात्र तिच्याच मुळावर उठली आहे ...........? भूमातेच्या कवच कुंडल्रे हिरवी वस्त्रे हरण करण्याचाच हा प्रकार आहे ना........? जिच्या जीवावर हिं मानवजात मंगळावर जाण्याची स्वप्ने पाहत आहे तिला काही काल आपले पाय मातीतच घट्ट रोवण्यसाठी तर ही भूमातेने लढवलेली ही शक्कल तर नसावी .....….? काहींही म्हणा पण तिने आपल्या स्वार्थी लेकरांना जमिनीवर आणले आहे हे मात्र नक्की . दोन तीन दिवसापासूनचा चंद्र आपण बघितला असेल किती मोहक ..?,किती मोठा...? ,किती स्पष्ट ....? समुद्रकिनारे ,नदीकिनारे स्वच्छ झालेले आहेत ,दूरची पर्वत शिखरे जवळ भासू लागली आहेत .ऐन उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ गारवा जाणवत आहे .अहो आपल्या आसपास चिमण्या चिवचिवाट करू लागल्या आहेत .पुन्हा एकदा धरणीमाता आपल्या साऱ्या पापांना पोटात घालून सज्ज होत तर नसेल ना ........? पुन्हा एका अग्निदिव्याला सामोरे जाण्यासाठी....?मानवाला ही थोडे याबाबत चिंतन ,मनन ,पश्चात्ताप होण्यासाठी आपल्याच घरी काही दिवस ठेवले नसेल ना बंदिवासात .......? काही काळ घेतलेला हा अर्धविराम या अनाकलनीय प्रवासात सिंहावलोकन करण्यासारखा आहे एवढे मात्र नक्की .होत आहे थोडासा त्रास पण आपण जसे आपल्या मुलांसाठी भविष्याचा विचार करून आपल्या पोटाला चिमटे घेतो तसे आपल्या साऱ्या मानवजातीच्या उज्वल भविष्यासाठी काही दिवस आपल्याच घरात आपल्याच प्रियजनांबरोबर एकत्र राहायला ........?
गेले दोन दिवस दुपार नंतर होत असलेला पावसाचा शिंतोडा,जो साधारण मे महिन्यात होतो तो अगदी चक्क एक महिना अगोदर म्हणजे एप्रिल महिन्यात होतोय.....यावरून यावेळी पाऊस जो जुलेकडे जाऊन पोहचला आहे तो सुरु होईल का खूप वर्षांनी जून मध्ये .........?????? माझ्या मनाला पडलेला एक प्रश्न.*
© विष्णू ढेबे,महाबळेश्वर -7588686065

Thursday, 21 November 2019
एक अनोखी व संस्मरणीय सांस्कृतिक देवाणघेवाण
🌎🌎🌎👨❤👨
*CULTURAL EXCHANGE PROGRAMME*
*दुपारच्या सत्रात गावातील जीवनमान पाहण्यासाठी मुलांचे पाचचे गट करण्यात आले, प्रत्यक्ष गटाने घरात जाऊन घरांची रचना, आहार, पोशाख, चालीरीती, परंपरा जाणून घेण्याच प्रयत्न बेल्जियम मधील मुलांनी केला. यावेळी चुलीवर भाकरी करण्याचा तसेच जात्यावर दळण दळण्याचा अनुभव मुलींनी घेतला.*
*त्यानंतर निघाली शिवारफेरी , प्रत्यक्ष गावातील शेतांमध्ये जाऊन शेतीविषयक माहिती संकलित करण्यात आली . स्ट्रॉबेरी, वांगी, टोमॅटो, मिरची यांची लागवड प्रत्यक्ष पाहण्याचा योग या मुलांना मिळाला . शेतामध्ये एका ठिकाणी भात झोडणी चालू होती, त्याठिकाणी या मुलांनी प्रत्यक्ष भातझोडणी केली. यावेळी सर्वांनाच विलक्षण समाधान वाटले. बेल्जियम मध्ये ही स्ट्रॉबेरी मोठया प्रमाणात होते ,तेथील शेतीपद्धत तसेच फळ पिकांची माहिती आमच्या मुलांना त्यांनी सांगितली.सुरवातीला नकार देणाऱ्या या मुलांनी तुती,काकडी यांसारख्या फळांवर चांगलाच ताव मारला.*
*शेवटच्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. छोटासा खेळ खेळल्यानंतर सुरवातीला चिखली शाळेतील मुलांनी चार कार्यक्रम सादर केले , लावणी नृत्याला त्यांनी खूप दाद दिली, त्यानंतर बेल्जियम मधील मुलांनी त्यांचे तीन नृत्याचे कार्यक्रम सादर केले शेवटचा कार्यक्रम थीम गाण्यावर एकत्रित दोन्ही शाळेतील मुलांनी सादर केला, सांस्कृतिक कार्यक्रमात खूपच धमाल आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवट दोन्ही देशांच्या राष्ट्रगीत गायनाने झाला.*
*समारोपाच्या सत्रात बेल्जियम शाळेने शिवाजी महाराजांची प्रतिमा , तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. आमच्यवतीने स्वामी विवेकानंद यांची मूर्ती भेट देण्यात आली. आभार प्रदर्शन झाल्यानंतर निरोपाची वेळी बेल्जियम मधील मुलांनी स्वतःचे मेल id दिले व सदैव संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.हे विश्वची माझे घर हा उच्च हेतू मनांमद्ये ठेवून एकमेकांना समजावून घेऊन एकत्र येण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयोगी पडेल. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी चिखली गावातील सर्वच ग्रामस्थ , शाळा व्यवस्थापन समिती, युवक मंडळ, माजी विद्यार्थी यांनी उत्तम सहकार्य केले .*
*शब्दांकन*
*श्री. विष्णू ढेबे*
*पदवीधर शिक्षक*
*जि. प. शाळा चिखली*
*CULTURAL EXCHANGE PROGRAMME*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथे सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत युरोपमधील बेल्जियम देशातील सेंट लॅम्बर्ट नस येथील 30 शालेय विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या शिक्षिका मिस मर्लिन, मिस क्रिस्टीन , मिस लिसा यांनी भेट दिली. दिवसभर वेगवेगळ्या माध्यमातून दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी विचारांची ,संस्कृतींची, देवाणघेवाण केली.*
*सकाळी 9 वाजता बेल्जियम मधील मुलामुलींचे आगमन झाले . शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व झांज पथकाच्या द्वारे स्वागत केले. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कुंकम तिलक व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सुरवातीला दिवसभराच्या वेळेचे नियोजन करण्यात आले. औपचारिक स्वागत झाल्यानंतर चिखली शाळेतील विविध उपक्रमांची माहिती पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे दाखवण्यात आली. विविध प्रश्न विचारून सर्व मुलांना बोलते करण्यात आले , ज्ञारचनावादी शालेय वर्ग रचना , शालेय बाग पाहून सर्व विद्यार्थी खुश झाले. भारतीय शिक्षण पद्धती तील महत्वाच्या बाबी मुलांनी जाणून घेतल्या व मुलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.**दुपारच्या सत्रात गावातील जीवनमान पाहण्यासाठी मुलांचे पाचचे गट करण्यात आले, प्रत्यक्ष गटाने घरात जाऊन घरांची रचना, आहार, पोशाख, चालीरीती, परंपरा जाणून घेण्याच प्रयत्न बेल्जियम मधील मुलांनी केला. यावेळी चुलीवर भाकरी करण्याचा तसेच जात्यावर दळण दळण्याचा अनुभव मुलींनी घेतला.*
*त्यानंतर निघाली शिवारफेरी , प्रत्यक्ष गावातील शेतांमध्ये जाऊन शेतीविषयक माहिती संकलित करण्यात आली . स्ट्रॉबेरी, वांगी, टोमॅटो, मिरची यांची लागवड प्रत्यक्ष पाहण्याचा योग या मुलांना मिळाला . शेतामध्ये एका ठिकाणी भात झोडणी चालू होती, त्याठिकाणी या मुलांनी प्रत्यक्ष भातझोडणी केली. यावेळी सर्वांनाच विलक्षण समाधान वाटले. बेल्जियम मध्ये ही स्ट्रॉबेरी मोठया प्रमाणात होते ,तेथील शेतीपद्धत तसेच फळ पिकांची माहिती आमच्या मुलांना त्यांनी सांगितली.सुरवातीला नकार देणाऱ्या या मुलांनी तुती,काकडी यांसारख्या फळांवर चांगलाच ताव मारला.*
*शेवटच्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. छोटासा खेळ खेळल्यानंतर सुरवातीला चिखली शाळेतील मुलांनी चार कार्यक्रम सादर केले , लावणी नृत्याला त्यांनी खूप दाद दिली, त्यानंतर बेल्जियम मधील मुलांनी त्यांचे तीन नृत्याचे कार्यक्रम सादर केले शेवटचा कार्यक्रम थीम गाण्यावर एकत्रित दोन्ही शाळेतील मुलांनी सादर केला, सांस्कृतिक कार्यक्रमात खूपच धमाल आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवट दोन्ही देशांच्या राष्ट्रगीत गायनाने झाला.*
*समारोपाच्या सत्रात बेल्जियम शाळेने शिवाजी महाराजांची प्रतिमा , तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. आमच्यवतीने स्वामी विवेकानंद यांची मूर्ती भेट देण्यात आली. आभार प्रदर्शन झाल्यानंतर निरोपाची वेळी बेल्जियम मधील मुलांनी स्वतःचे मेल id दिले व सदैव संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.हे विश्वची माझे घर हा उच्च हेतू मनांमद्ये ठेवून एकमेकांना समजावून घेऊन एकत्र येण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयोगी पडेल. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी चिखली गावातील सर्वच ग्रामस्थ , शाळा व्यवस्थापन समिती, युवक मंडळ, माजी विद्यार्थी यांनी उत्तम सहकार्य केले .*
*शब्दांकन*
*श्री. विष्णू ढेबे*
*पदवीधर शिक्षक*
*जि. प. शाळा चिखली*
www.vishnudhebe.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)
- April 2023 (1)
- March 2023 (1)
- October 2022 (1)
- July 2020 (1)
- June 2020 (2)
- May 2020 (10)
- April 2020 (2)
- November 2019 (1)
- October 2019 (1)
* विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून अनुभवला आनंदी दिवस...* ====================== *शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यां...
-
Loading…
-
Loading…
-
Loading…